आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Open Tennis Tournament, Latest News, Divya Marathi,

सोमदेव देववर्मन किताबापासून एका पावलावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- टेनिसपटू सोमदेव देववर्मन दिल्ली ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. उपांत्य सामन्यात रशियाच्या इव्हेग्ने डॉनस्कॉयचा त्याने 6-4, 6-2 ने धुव्वा उडवला. दोन्ही खेळाडूंतली ही तिसरी लढत होती. मियामी मास्टर्स तसेच कोलकातील स्पर्धेत डॉनस्कॉयने त्याला हरवले होते. सोमदेवने डॉनस्कॉयविरुद्ध पहिल्याच विजयाची नोंद केली. दुसरा मानांकित आणि क्रमवारीत 96 व्या क्रमांकावर असलेल्या सोमदेवने 1 तास 28 मिनिटांत सामना आपल्या नावे केला. आतापर्यंत सोमदेवने दोन स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याला विजयासाठी फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत. सुरुवातीला पहिल्याच सेटमध्ये डॉनस्कॉयने घेतलेली आघाडी क्षणिक ठरली.
सेरेना बाहेर; व्हीनस विजयी
दुबई 2 जगातील नंबर वन सेरेनाचे दुबई ओपन टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दुसरीकडे माजी नंबर वन व्हीनस विल्यम्सने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिने महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात डेन्मार्कच्या कॅरोलीन वोज्नियाकीला पराभूत केले. तिने सरळ दोन सेटमध्ये 6-3, 6-2 ने उपांत्य सामना जिंकला. फ्रान्सची खेळाडू एलिझा कार्नेटने सेरेनाविरुद्ध लढतीत धक्कादायक विजय मिळवला. तिने सेरेनाला 6-4, 6-4 अशा फरकाने पराभूत करून अंतिम फेरी गाठली.
कडवा संघर्ष केला
गेल्या आठवड्यात त्याने (डॉनस्कॉय) मला हरवले होते. आज मी फक्त लढत होतो. त्याच्यासमोर कठीण आव्हान ठेवत होतो. मला चांगली सुरुवात करता आली नाही. मात्र, आवाका ओळखून खेळ केला. जोरदार फटके लगावले. तो एक गुणवान प्रतिस्पर्धी आहे. अंतिम फेरीत पोहोचल्याचा आनंद आहे. - सोमदेव देववर्मन