Home »Sports »From The Field» Opener Gautam Gambhir Dropped, Off-Spinner Harbhajan Singh Comes Back In Indian Test Squad For Australia Series.

ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी गंभीरला डच्‍चू, हरभजनचे पुनरागमन

वृत्तसंस्‍था | Feb 10, 2013, 14:31 PM IST

मुंबई- ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेट सामन्‍यांच्‍या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्‍यात आली आहे. सलामीवीर गौतम गंभीरला वगळण्‍यात आले असून हरभजन सिंगने संघात पुनरागमन केले आहे.

निवड समितीने आज संघ जाहीर केला. निवड समितीने गौतम गंभीरला डच्‍चू देण्‍याचा निर्णय घेतला. त्‍याच्‍याऐवजी मुरली विजयवर विश्‍वास ठेवला आहे. विरेंद्र सेहवागलाही पुन्‍हा एकदा संघी देण्‍यात आली आहे. तसेच शिखर धवनला प्रथमच संधी देण्‍यात आली आहे.

गोलंदाजीची धुरा इशांत शर्मा, प्रग्‍यान ओझा, आर. अश्विन, भुवनेश्‍वर कुमार आणि अशोक डिंडा यांच्‍यावर राहणार आहे. पाकिस्‍तान अणि इंग्‍लंडविरुद्ध दमदार कामगिरी करुन प्रभावित करणा-या भुवनेश्‍वर कुमारला कसोटीत संधी देण्‍याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे. इशांत शर्मासोबत तो गोलंदाजीची सुरुवात करण्‍याची शक्‍यता आहे.

भारतीय संघ पुढीलप्रमाणे- महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सचिन तेंडुलकर, विराट कोहली, विरेंद्र सेहवाग, मुरली विजय, अजिंक्‍य रहाणे, शिखर धवन, हरभजन सिंग, चेतेश्‍वर पुजारा, इशांत शर्मा, अशोक डिंडा, भुवनेश्‍वर कुमार, प्रग्‍यान ओझा, आर. अश्विन, रविंद्र जडेजा

Next Article

Recommended