आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opening Batsman's Shikhar Davan Century In Champion Trophy London

धवनच्या कामगिरीचे ऐतिहासिक शिखर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्डिफ- सलामीवीर शिखर धवनने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक खेळी केली. यासह त्याने अनेक दिग्गज खेळाडूंच्या कामगिरीची बरोबरीही साधली. त्याने गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीच्या सामन्यात 80 चेंडूंत वनडे करिअरमधील पहिले शतक ठोकले. वनडे व कसोटीत 100 पेक्षा कमी चेंडूत शतक ठोकणारा धवन तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारतीय संघाच्या के. श्रीकांत व कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ही कामगिरी केली होती. धवनने या वर्षी मार्चमध्ये मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणाच्या कसोटीत 85 चेंडूंत शतक ठोकले होते.

श्रीकांतची कामगिरी : श्रीकांत यांनी 2 जानेवारी 1986 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात पहिले कसोटी शतक ठोकले होते. त्यांनी 116 धावांची खेळी करताना 97 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले होते. त्यांनी 7 सप्टेंबर 1986 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपले पहिले वनडे शतक साजरे केले होते.
धोनीची कामगिरी : धोनीने पहिले वनडे व कसोटी शतक योगायोगाने पाकिस्तानविरुद्ध ठोकले आहे. विशेष म्हणजे दोन्हींची धावसंख्या समान आहे. त्याने 5 एप्रिल 2005 रोजी विशाखापट्टणमला पाकविरुद्ध 148 धावा काढल्या.तसेच 23 जानेवारी 2006 रोजी फैसलाबाद येथे कसोटी शतक ठोकले.

‘पाजी’ने केला कौतुकाचा वर्षाव
भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिलदेव (पाजी) यांनी शिखर धवनवर कौतुकाचा वर्षाव केला. ‘चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामी सामन्यात धडाकेबाज शतक ठोकून धवनने सचिन व वीरेंद्र सेहवागची उणीव भासू दिली नाही. त्याने कौतुकास्पद कामगिरी केली आहे,’ अशा शब्दांत समालोचक कपिलदेवने धवनची स्तुती केली.