आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियन सुपर लीग फुटबॉलचा रोमांच आजपासून, कोलकात्यात उद्घाटन सोहळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - भारतीय फुटबॉलच्या इतिहासात सर्वांधिक स्टार खेळाडूंचा सहभाग असलेल्या पहिल्या सत्राच्या इंडियन सुपर लीगला रविवारपासून सुरुवात होत आहे. कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवरील रंगारंग कार्यक्रमाने लीगचे उद्घाटन होणार आहे. देशभरात नव्याने पुन्हा एकदा फुटबॉलचे वारे जोमाने वाहावे, याच उद्देशाने लीग रंगणार आहे.

येत्या २० डिसेंबरपर्यंत चालणा-या या लीगचा उद्घाटनीय सामना गांगुलीच्या अ‍ॅथलेटिको डी कोलकाता आणि मुंबई सिटी एफसी यांच्यात होणार आहे. या लीगमध्ये वर्ल्डकप विजेत्या संघातील पाच माजी खेळाडू नशीब आजमावणार आहेत. केरळा ब्लास्टर्सकडून ४४ वर्षीय डेव्हिड जेम्स नशीब आजमावणार आहे. तो या लीगमधील सर्वात वयस्कर खेळाडू असेल.
कोलकात्याविरुद्ध लढतीत रणबीर कपूरचा मुंबई सिटी एफसी संघ अधिक मजबूत आहे. या संघाकडे फ्रान्सच्या निकोलस अनेलकासह स्वीडनचा फ्रेड्रिक लुंगबर्ग, भारताचा नंबर वन गोलकिपर सुब्रत पॉल, अनुभवी सय्यद रहीम नबी आणि लालरिंदिका राल्टेसारखे स्टार खेळाडू आहेत. मँचेस्टर सिटीचे माजी व्यवस्थापक पीटर रिडच्या मार्गदर्शनाखाली मुंबईचा लीगमध्ये खेळणार आहे. कोलकाता टीमकडे लिव्हरपूलचा माजी खेळाडू लुइस गार्सिया, ली लीगचा बोर्जा फर्नांडिस, जोफ्रे मातेयुसारखे खेळाडू आहेत.