आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑरेंज कॅपसाठी गेल-हसी यांच्यात चुरस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आयपीएल-6 मध्ये सर्वाधिक धावांच्या आधारे ऑरेंज कॅप मिळवण्यासाठी क्रिस गेल (रॉयल चॅलेंर्जस बंगळुरू) आणि मायकेल हसी (चेन्नई सुपरकिंग्ज) यांच्यात जणू काही ‘टॉम अँड जेरी’सारखी शर्यत लागली आहे.

कॅरेबियन तुफानी क्रिस गेलने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध सामन्यात 33 धावांच्या खेळीत 600 धावांचा टप्पा गाठला. यासह त्याने ऑरेंज कॅप आपल्या नावे केली. मात्र, रविवारी चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या लढतीत मायकेल हसीने 40 चेंडूंत 40 धावा काढून गेलला मागे टाकले आणि थोड्याच वेळात ऑरेंज कॅप पुन्हा स्वत:कडे घेतली.

ऑरेंज कॅपसाठीही संघर्ष : आयपीएल-6 मध्ये गोलंदाजांना दिल्या जाणार्‍या पर्पल कॅपसाठी झुंज वेगवान झाली आहे. स्पध्रेत 12 मेपर्यंत संपलेल्या सामन्यानंतर कोलकाता नाइट रायडर्सचा फिरकीपटू सुनील नारायण, चेन्नई सुपरकिंग्जचा अष्टपैलू खेळाडू डेवेन ब्राव्हो, रॉयल चॅलेंर्जसचा गोलंदाज आर. विनयकुमार प्रत्येकी 22 विकेट घेऊन पुढे आहेत.

रोमांचक आहे नंबर वनचा खेळ
आयपीएलच्या गेल्या काही सामन्यांपासून गेल आणि हसी यांच्यात ऑरेंज कॅप मिळवण्याबाबत सुरू असलेली शर्यत अत्यंत रोमांचक ठरत आहे. एका सामन्यात ही कॅप हसीच्या डोक्यावर असते, तर पुढच्या सामन्यात ही कॅप गेलच्या ताब्यात येते. दोन्ही फलंदाज धावा काढण्याच्या शर्यतीत अत्यंत रोमांचक झुंज देत आहेत. या यादीत आरसीबीचा विराट कोहली 521 धावांसह तिसर्‍या आणि राजस्थान रॉयल्सचा शेन वॉटसन 483 धावांसह चौथ्या स्थानी आहे.

हसीच्या 614 धावा
आयपीएल-6 मध्ये मायकेल हसीने आतापर्यंत 13 सामने खेळून 55.81 च्या सरासरीने सर्वाधिक 614 धावा काढल्या आहेत. तो या यादीत अव्वलस्थानी आहे. हसीच्या या सर्वाधिक धावांच्या विक्रमात पाच अर्धशतकांचा समावेश आहे. यानंतर कॅरेबियन तुफान क्रिस गेल 603 धावांवर हसीपेक्षा अवघ्या 11 धावांनी मागे दुसर्‍या क्रमांकावर आहे.