आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Organizing Party Conventions At The Shiv Chhatrapati Sports Complex

दौरा राहुल गांधींचा, हाल खेळाडूंचे, पुण्‍यातील बालेवाडीतील प्रकार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्‍यात बुधवारी कार्यकर्त्‍यांच्‍या बैठकीबरोबरच कॉंग्रेसचे उपाध्‍यक्ष राहुल गांधी यांचा दोन दिवसीय महाराष्‍ट्र दौरा संपुष्‍टात आला. राहुल गांधींचा हा दौरा यशस्‍वी झाल्‍याचा दावा कॉंग्रेस करत असली तरी यामुळे एका नवा वाद निर्माण झाला आहे.

राहुल यांच्‍या या कार्यक्रमामुळे एकीकडे युवा कार्यकर्त्‍यांमध्‍ये उत्‍साह निर्माण झाला असला तरी दुसरीकडे वर्तमानकाळात देशाचे नाव उज्‍वल करणा-या युवा खेळाडुंना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला.

मागील दोन वर्षांत राहुल यांचा हा तिसरा पुणे दौरा होता. त्‍यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्‍यांमध्‍ये कमालीचा उत्‍साह होता. राहुल यांना खुश करण्‍यासाठी त्‍यांनी कोणतीच कसर सोडली नाही. साधारणपणे कार्यकर्त्‍यांचे संमेलन हे खुल्‍या मैदानात किंवा बंदिस्‍त सभागृहात होत असते. परंतु, जेव्‍हा खुद्द युवराजांचाच कार्यक्रम असेल तेव्‍हा सर्व कायदे-नियमांना कसा फाटा दिला जातो याचे उदाहरण म्‍हणजेच कार्यकर्त्‍यांचे हे संमेलन. याचा अनुभव पहिल्‍याच दिवशी आला. प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष करीत युवराजांच्‍या राहण्‍याची सोय राज्‍यपाल आणि राष्‍ट्रपतींच्‍या मुक्‍कामासाठी असलेल्‍या राजभवनात करण्‍यात आली होती. विशेष म्‍हणजे आतापर्यंत या राजभवनात असा प्रकार कधी झाला नव्‍हता.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून वाचा राहुल यांच्‍या दौ-यामुळे खेळाडूंची कशी झाली अडचण...