आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी रिवाला बघितले, तेव्हा ती मृत होती : ऑस्कर प्रिस्टोरियस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिटोरिया - चुकून गोळी लागल्यानंतर मी रिवाला माझ्या हातात घेऊन रक्तस्राव कमी व्हावा, यासाठी प्रयत्न करीत होतो. मात्र, माझे लक्ष गेले तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता, असा जबाब माजी ऑलिम्पियन अपंग धावपटू ऑस्कर प्रिस्टोरियसने न्यायालयात केला.
रिवाने श्वासोच्छ्वास करावा, तिचा रक्तस्राव कमी व्हावा यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करीत होतो. मात्र, ते शक्य झाले नाही. टॉयलेटच्या दारामागून मी गोळीबार केला. त्यात ती जागीच गतप्राण झाली होती. व्हॅलेंटाइन डेच्या रात्री कोणी अगंतुक माझ्या घरात घुसत असल्याचा आभास झाल्यानेच मी गोळीबार केल्याचे प्रिस्टोरियसने म्हटले आहे. मी खूप घाबरलो असल्यानेच माझ्या हातून चारदा गोळीबार झाला. प्रिस्टोरियसला न्यायालयाने स्वत:च्याच खटल्यातील साक्षीदार म्हणून जबाब नोंदवण्याचे आदेश दिले होते. या जबाबातही त्याने पहिल्यापासूनचाच दावा कायम
ठेवला आहे.