आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Oscar Pistorius News In Marathi, Double amputee Track Star

खटल्याचा खर्च भागवण्यासाठी ब्लेड रनर ऑस्कर पिस्टोरियस विकणार बंगला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिटोरिया (दक्षिण आफ्रिका) - दक्षिण आफ्रिकेचा प्रसिद्ध ब्लेड रनर ऑस्कर पिस्टोरियस खटल्याचा खर्च भागविण्यासाठी त्याच्या आलिशान बंगला विकणार असल्याचे त्याच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले आहे. गर्लफ्रेंड रिवा स्टिनकॅम्पवर गोळीबार करून तिचा खून केल्याप्रकरणी त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. पिस्टोरियस विकत असलेल्या बंगल्यातच त्याने रिवावर गोळीबार केला होता.
बंगल्यात चोर आल्याचे समजून 27 वर्षिय पिस्टोरियस याने रिवा स्टिनकॅम्पवर गोळीबार केला होता. यात ती जागीच मृत्युमुखी पडली होती. गोळीबार केला तेव्हा चोर नसून रिवा असल्याचे पिस्टोरियसला माहित नव्हते, असे त्याची बाजू मांडताना त्याच्या वकीलाने म्हटले आहे. परंतु, पिस्टोरियस याने मुद्दाम रिवावर गोळीबार केल्याचे सरकारी वकीलाने म्हटले आहे. या प्रकरणी पिस्टोरियस जर दोषी आढळून आला तर त्याला तब्बल 25 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
पिस्टोरियसच्या सुनावणीचे जगभरात लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येत आहे. सुनावणीला निर्धारित वेळेपेक्षा तीन आठवड्यांचा अधिक कालावधी लागण्याची शक्यता असल्याने बंगला विकणे आवश्यक असल्याचे पिस्टोरियसच्या वकीलाने सांगितले आहे.
14 फेब्रुवारी 2013 रोजी घडलेल्या घटनेनंतर पिस्टोरियस कधीही या बंगल्यात परतलेला नाही. तो भविष्यात कधीही या बंगल्यात राहू शकणार नाही, असे त्याच्या वकीलाने सांगितले आहे. न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर पिस्टोरियस नातलगांच्या घरी राहत आहे.
ब्लेड रनर ऑस्कर पिस्टोरियस याच्या बंगल्याचे छायाचित्र बघा पुढील स्लाईडवर...