Home »Sports »Other Sports» Oscar Pristorias File Affidavt In Court : Love Reva, By Mistake Murderd

रीवावर होते जीवापाड प्रेम, चुकून झाला खून- ऑस्कर प्रिस्टोरियसचे कोर्टात शपथपत्र

वृत्तसंस्था | Feb 20, 2013, 09:51 AM IST

  • रीवावर होते जीवापाड प्रेम, चुकून झाला खून- ऑस्कर प्रिस्टोरियसचे कोर्टात शपथपत्र

प्रिटोरिया - गर्लफ्रेंड रीवा स्टिनकेम्पच्या खुनाचा आरोपी असलेला ‘ब्लेड रनर’ अर्थात ऑस्कर प्रिस्टोरियसने न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे. माझे रीवावर खूप प्रेम होते. तिचा खून करण्याचा इरादा नव्हता. चुकून तिचा खून झाला, असे त्याने शपथपत्रात म्हटले.

प्रिस्टोरियसचे शपथपत्र बॅरी राउक्सने न्यायालयात वाचले. यात तो म्हणाला, ‘मला वाटले की बाथरूममध्ये एक जण लपलेला आहे आणि मी गोळ्या झाडल्या. मला रात्रीच्या अंधारात वाटले की कोणीतरी बाथरूमच्या खिडकीतून घरात प्रवेश केला आहे. मी पलंगावरून उठलो, आपले कृत्रिम पाय फिट केले आणि बाथरूमकडे गेलो. रीवा दारामागे आहे याचा मला अंदाज नव्हता. मी दारावर गोळ्या झाडल्या आणि रीवाला पोलिसांना बोलावण्यासाठी जोराने हाक मारली. रीवा बेडवर नाही हे माझ्या लक्षात आल्यानंतर क्रिकेटची बॅट उचलून मी दारावर मारली. दार उघडले तेव्हा माझी मैत्रीण जमिनीवर कोसळल्याचे माझ्या लक्षात आले. ’

सरकारी वकील गॅरी नेलने या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाला ही माहिती दिली. प्रिस्टोरियसनेच आपली प्रेयसी रिवा स्टिनकेम्पवर गोळ्या झाडल्या होत्या, असे त्यांनी म्हटले. तीन राउंड गोळ्या लागल्याने स्टिनकेम्पचा मृत्यू झाला. ती कायद्याची पदवीधर आणि मॉडल होती. नेल न्यायालयाला ही माहिती देत असताना तेथे उपस्थित असलेला प्रिस्टोरियस सतत हमसून रडत होता. बचाव पक्षाचे वकील बॅरी राउक्स यांनी ऑस्करवर लावण्यात आलेल्या खुनाच्या आरोपावर आक्षेप घेतला. खुनामागील सर्व तथ्य अजून शंकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.

नकली पाय लावून गोळ्या झाडल्या- ‘ब्लेड रनर’च्या नावाने सुप्रसिद्ध असलेला धावपटू ऑ स्कर प्रिस्टोरियसने आपले नकली पाय फिट केले आणि आपल्या बेडरूम बाहेर येऊन बाथरूमकडे गेला. तेथे लपण्याचा प्रयत्न करीत असलेल्या आपल्या प्रेयसीला त्याने चार गोळ्या मारल्या.


आयपॅडने उलगडू शकते रहस्य-दक्षिण आफ्रिकेचा पॅरालिम्पिक धावपटू ऑस्कर प्रिस्टोरियसची प्रेमिका रिवा स्टिनकेम्पच्या हत्येचे रहस्यभेद करण्यात तिचा आयपॅड मोलाची भूमिका पार पाडू शकतो. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार स्टिनकेम्पचा आयपॅड पोलिसांच्या हाती लागला आहे. या आयपॅडवर एक माजी रग्बी खेळाडू फ्रान्सुआ होगार्डचा एक मॅसेज आहे. यामुळेच स्टिनकेम्पचा खून झाला असण्याची शक्यता आहे. हा आयपॅड ऑस्करच्या बेडरूममध्ये सापडल्याची चर्चा आहे. या आयपॅडशिवाय दोघांच्या मोबाइल फोनचा डाटाही पोलिस तपासत आहेत.

Next Article

Recommended