आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Oscar Winner Pinki To Toss The Coin At Wimbledon Final

सचिन तेंडुलकरला मिळणार नाही, अशी संधी मिळाली एका चिमुकलीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सचिन तेंडुलकर सारख्या जागतिक किर्तीच्या खेळाडूला मिळणार नाही अशी संधी एका गरीब घरातील चिमुकलीला मिळाली आहे. सात जुलै रोजी होणारया विम्बल्डन टेनिस चॅम्पिअनशिपमधील अंतिम सामन्याचा टॉस करण्याची संधी चक्क पिंकी नावाच्या एका चिमुकलीला मिळणार आहे.

उत्तर प्रदेशमधील रामपूर या छोट्याशा गावातील पिंकीचा वरचा ओठ जन्मताच तुटलेला होता. जगभरातील अनेक बालके या नैसर्गिक समस्येने पीडित आहेत. पिंकीच्या सुदैवाने विदेशातील एका समाजसेवी संस्थेच्या मदतीने तिला यातून सुटका मिळाली. एवढेच नव्हे तर तिच्या या आजारावर एका लघूचित्रफित तयार करण्यात आली होती. यामुळे तिला ऑस्कर सारख्या नामांकीत मंचावर सन्मानित करण्यात आले आहे. आता ती विम्बल्डन टेनिस चॅम्पिअनशिपमधील अंतिम सामन्याचा टॉस करून टेनिसच्या इतिहासात आपले नाव कोरणार आहे.


आणखी छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...