आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टाॅप’साठी राहुल अावारेसह ४५ खेळाडूंची निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अागामी २०१६ रिआे अाॅलिम्पिक स्पर्धेत भारताला अधिकाधिक पदके जिंकता यावीत यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने नवीन याेजना सुरू केली अाहे. यासाठी ‘टार्गेट अाॅलिम्पिक पाेडियम’ नावाची याेजना अाखण्यात अाली. त्यासाठी देशभरातील अव्वल ४५ खेळाडूंची निवड करण्यात अाली अाहे. यात महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल अावारेला संधी मिळाली अाहे. या याेजनेनुसार अाता त्याला ४५ लाखांची मदत करण्यात येणार अाहे. त्याची या टाॅप याेजनेसाठी निवड झाली अाहे. यात सर्वाधिक १७ नेमबाजांचा समावेश अाहे.
केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद साेनाेवाल यांनी मंगळवारी लाेकसभेत ही माहिती दिली.

इंडिया इन्फ्रास्ट्रक्चरची ३० काेटींची मदत
क्रीडा मंत्रालय अाणि इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी यांच्यात टाॅप याेजनेसाठी एक करार करण्यात अाला. या करारानुसार ही कंपनी राष्ट्रीय क्रीडा विकास काेशसाठी (एनएसडीएफ) तब्बल ३० काेटींची मदत करणार अाहे. ही कंपनी प्रत्येक वर्षी १० काेटींची मदत करेल. या कंपनीने एक मार्च राेजी एनएसडीएफला १० काेटी रुपये दिले अाहेत.
अशी केली जाईल मदत
१.१२ काेटी (प्रत्येकी) : गगन नारंग, मानवजित, अभिनव बिंद्रा, संजीव राजपूत (नेमबाज), विकास गाैडा (थाळीफेकपटू)
९० लाख (प्रत्येकी) : सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, पी. कश्यप, के. श्रीकांत (बॅडमिंटन)
७५ लाख (प्रत्येकी) : मेरी काेम, सरितादेवी, देवेंद्राेसिंग, विजेंदरसिंग (बाॅक्सर), हिना, जितू राॅय, पी. प्रकाश, विजयकुमार (नेमबाज), सुशीलकुमार, याेगेश्वर दत्त, अमितकुमार (कुस्ती).
६० लाख (प्रत्येकी) : अारएमव्ही गुरुसाईदत्त, एचएस प्रणव (बॅडमिंटन), अायाेनिका पाॅल, अपूर्वी चंदेला, अकुंर मित्तल, माेहंंमद असाब व क्यानन (नेमबाज)