आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Our Plan Against Kolkata Knight Riders Was Suceed Says Sidhharth Trivedi

कोलकाताविरूद्ध रणनीती कामाला आली : सिद्धार्थ त्रिवेदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध खेळताना आम्ही ठरवलेली रणनीती कामाला आली. याचा फायदा झाला, अशी प्रतिक्रिया राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ त्रिवेदीने व्यक्त केली. ही आमची वेल प्लॅन स्ट्रॅटेजी होती, असे सामन्यानंतर तो म्हणाला. आम्हाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा होता. आमच्या अकरा खेळाडूंत एकही फिरकीपटू नव्हता. आमची मदार फक्त वेगवान गोलंदाजांवर होती. आम्ही हा विश्वास सार्थकी ठरवला. संघाला गरज असताना आम्ही विकेट मिळवू शकतो, हे सिद्ध झाले, असेही त्रिवेदीने नमूद केले.

राजस्थान रॉयल्सने दमदार प्रदर्शन करून गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सला 19 धावांनी हरवले होते. सिद्धार्थ त्रिवेदीने अप्रतिम गोलंदाजी करताना तीन गडी बाद केले. तोच सामनावीराचा मानकरी ठरला.

आयपीएलमध्ये रॉयल्सचे 39 विजय

* आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध केकेआरने नीचांकी धावसंख्या (125) नोंदवली.

* आयपीएलमध्ये आतापर्यंत 74 सामने खेळताना राजस्थान रॉयल्सने 39 सामने जिंकले आणि 34 गमावले. यात राजस्थान रॉयल्सने 53.37 सरासरीने विजय मिळवला.

* जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर केकेआरविरुद्ध आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांपैकी राजस्थानने तिसरा विजय मिळवला.

* राजस्थानच्या सिद्धार्थ त्रिवेदीच्या आयपीएलमध्ये आता 27.71 च्या सरासरीने 56 विकेट झाल्या आहेत.

* राहुल द्रविड आयपीएलमध्ये तब्बल 14 व्यांदा त्रिफळाचीत झाला. कुमार संगकारासुद्धा इतक्याच वेळा बोल्ड झाला असून, जॅक कॅलिस तब्बल 15 वेळा बोल्ड झाला आहे.