आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कांगारूंमध्ये आता पूर्वीसारखा दम नाही!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी हा कॉलम लिहीत असताना ऑस्ट्रेलियाने चौथ्या कसोटीत 262 धावा काढल्यानंतर टीम इंडियाच्या 8 विकेट 266 धावांत गारद केल्या होत्या. चार सामन्यांच्या मालिकेत चौथ्यांदा ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या चारपैकी तीन सामन्यांत भारताने विजय मिळवला. आता चौथ्या कसोटीतील जय-पराभव सध्या निश्चित नाही.
ऑस्ट्रेलिया संघाने सुरुवातीच्या तीन कसोटीत जी दयनीय कामगिरी केली, त्यावरून हे सिद्ध होते की गेल्या तीन ते चार दशकांतील हा त्यांचा सर्वाधिक दुबळा संघ आहे. या संघातील एकाही खेळाडूत मोठी खेळी करण्याची मानसिकताच नाही. कसोटीत काहीही होऊ शकते, असे माझे मत आहे. ऑस्ट्रेलिया संघावरील माझे हे आकलन तिस-या कसोटीपर्यंत आणि चौथ्या कसोटीतील पहिल्या डावाला बघून आहे. एक काळ असा होता, ज्या वेळी हिरव्या रंगाची बॅगी कॅप परिधान करणारे ऑस्ट्रेलियान विश्वविजेता बनून मिरवायचे. 125 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात ऑस्ट्रेलियानेच सर्वांवर जास्त वर्चस्व गाजवले. त्यांनी मिळवलेले यश इतर कोणत्याही टीमच्या ईर्षेचे कारण ठरू शकते.
तसे ऑस्ट्रेलियाचे प्रदर्शन नेहमी युवकांसाठी नेहमी प्रेरणादायी ठरले नाही. 1970 च्या दशकात इयान चॅपलच्या काळापासूनच कांगारूंनी मैदानावर शेरेबाजी सुरू केली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत स्लेजिंगच्या मदतीने विरोधकांवर मानसिक दबाव वाढवण्याचे काम ते करतात. 2003-04 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळण्यास गेलेल्या टीम इंडियाने कांगारूंना त्यांच्याच शैलीत उत्तर दिले होते. कांगारूंच्या आगाऊपणावर घाबरण्याऐवजी आपल्या खेळावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे आणि गरज पडल्यास स्लेजिंगची मदत घ्या..असा सल्ला सौरवने त्या वेळी आपल्या खेळाडूंना दिला होता. सध्याच्या ऑस्ट्रेलिया संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे स्किलची उणीव आहे. आताच्या संघात झुंज देण्याची प्रवृत्ती नाही..फलंदाजी आणि गोलंदाजीसुद्धा प्रशंसा करण्यासारखी नाही. इतकेच नव्हे तर संघातील खेळाडूंत शिस्त नसल्याने चार खेळाडूंना तिस-या कसोटीपूर्वी शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. आश्चर्य म्हणजे ज्या खेळाडूला (शेन वॉटसन) शिस्तभंगाच्या नावाखाली संघाबाहेर करण्यात आले होते, त्या खेळाडूला पुढच्या कसोटीत कर्णधार बनवण्यात आले. ऑस्ट्रेलियान खेळाडूंत आपसांत जमत नसले तरीही ते मैदानात दिसत नाही. उदाहरण म्हणून घ्यायचे झाल्यास महान डॉन ब्रॅडमन यांच्या काळातही संघातील खेळाडूंत अंतर्गत वाद होते. मात्र, मैदानावर याचा कधी भासही झाला नाही. त्याचप्रमाणे कॅरी पॅकर मालिकेच्या वेळीसुद्धा खेळाडू दोन गटांत विभागले होते, तेव्हासुद्धा ऑस्ट्रेलियान टीम मैदानात चांगली कामगिरी करीत होती.
ऑस्ट्रेलियान टीम या वेळी संक्रमणाच्या काळातून जात आहे. मागचे 20 महिने भारतीय संघसुद्धा संकटातून गेला आहे. सध्या भारतीय संघ घरच्या मैदानावर ‘शेर’ ठरत आहे. पुढच्या काही दिवसांत कसोटी क्रिकेट राहणार नाही. त्या वेळी हीच लय आणि असाच टीमवर्क कायम ठेवण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असेल. होय, ऑस्ट्रेलियालासुद्धा संकटातून बाहेर पडण्यासाठी मायदेशातील एखाद्या मालिकेची प्रतीक्षा करावी लागेल.