आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय फिरकीला कसे खेळायचे, हे अद्याप कांगारूंना कळले नाही

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारत दौर्‍यावर आलेला ऑस्ट्रेलियन संघ भारतीय फिरकीच्या जाळ्यात अडकून अधिकच गोंधळात सापडला आहे. भारतीय फिरकीपटूंपैकी ऑफस्पिनर आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा सर्वाधिक यशस्वी ठरले. मालिकेत आतापर्यंत चेन्नई, हैदराबाद, मोहली येथे झालेल्या तीन कसोटींत ऑस्ट्रेलियाच्या 60 विकेट पडल्या असून यातील 48 विकेट भारतीय फिरकीपटूंच्या नावे जमा झाल्या आहेत.

या मालिकेत ऑफस्पिनर आर. अश्विनने तीन सामन्यांत 21.40 च्या सरासरीने 22 विकेट घेतल्या आहेत. या मालिकेत त्याची सर्वर्शेष्ठ कामगिरी 103 धावांत 7 विकेट आणि सामन्यातील सर्वर्शेष्ठ प्रदर्शन 198 धावांत 12 विकेट असे ठरले आहे. दुसरीकडे जडेजा तसा वनडे आणि टी-20 उत्तम खेळाडू मानला जातो. मात्र, कर्णधार धोनीने मागच्या काही दिवसांत आपला डावखुरा फिरकीपटू प्रग्यान ओझापेक्षा जडेजाला अधिक प्राथमिकता दिली. पहिल्या दोन कसोटींत ओझाऐवजी जडेजाला खेळवले. धोनीची ही चाल जॉकपॉट ठरली.

जडेजाने तीन सामन्यांत 18.88 च्या सरासरीने 17 विकेट घेतल्या आहेत. त्याची सर्वर्शेष्ठ कामगिरी 33 धावांत 3 विकेट, तर सामन्यातील सर्वर्शेष्ठ प्रदर्शन 66 धावांत 67 विकेट असे ठरले.

पाहुण्यांचे फिरकीपटू अपयशी: भारतीय फिरकीपटूंच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचे फिरकी गोलंदाज दुबळे ठरले. नॅथन लॉयनने दोन सामन्यांत 6 विकेट, झेव्हियर डोहर्तीने 2 सामन्यांत 4 विकेट, तर ग्लेन मॅक्सवेलने एका सामन्यात 4 गडी बाद केले. भारतने फिरकीपटूंच्या बळावरच पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तीन कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम केला.

दिल्ली कसोटीसाठी धवनच्या जागी रैना- पहिल्याच कसोटीत विक्रमी शतकी खेळी करणारा दिल्लीचा स्फोटक फलंदाज शिखर धवन ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्या जागी सुरुवातीला गौतम गंभीरची निवड झाली होती. मात्र, गंभीरला काविळ झाल्याने त्याच्या जागी सुरेश रैना संधी देण्यात आली. आता 22 मार्चपासून चौथ्या कसोटीत फिरोजशाह कोटलावर धवनच्या जागी रैना खेळेल. मोहालीत क्षेत्ररक्षणादरम्यान धवनच्या बोटाला दुखापत झाली होती. मंगळवारी रवाना होण्यापूर्वी डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. या दुखापतीमुळे तो किमान तीन आठवडे मैदानाबाहेर राहील.