आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांगारूंची टीम दुबळी : गांगुली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतविरुद्ध कसोटी मालिकेत 0-3 ने सपाटून मार खाणार्‍या ऑस्ट्रेलिया टीमवर भारताच्या माजी कर्णधाराने टिकास्त्र सोडले. सध्या ऑस्ट्रेलिया संघ सर्वात दुबळी टीम असल्याचे मत भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने व्यक्त केले. मात्र, यावर सुनील गावसकरचा विश्वास नाही. 'भारत दौर्‍यावर आलेली ही आतापर्यंतची ऑस्ट्रेलियातील सर्वात दुबळी टीम आहे. या टीममध्ये फिरकीचा सामना करणारे फलंदाज नाहीत. तसेच विकेट काढणार्‍या स्पिनरचा अभाव आहे. मी कोणत्याही टीमचे मूल्यांकन करत नाही. मात्र, 1996 नंतर पहिल्यांदा मी ऑस्ट्रेलियाची अशी कमजोर टीम पाहिली, असेही गांगुली म्हणाला.