आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • P Kashyap And Sindhu Ready For Win In Asian Badminton Trophy

भारताचा पी.कश्यप, सिंधू विजयी सलामीसाठी सज्ज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तैपई- येथे 2013 आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपला बुधवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत विजयी सलामी देण्यासाठी भारताचे पी.कश्यप व पी.व्ही. सिंधू सज्ज झाले आहेत. भारताचे 13 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

महिला गटात भारताच्या पी.व्ही. सिंधूला पहिल्या फेरीत सहज विजय मिळवण्याची संधी आहे. एकेरीच्या पहिल्या फेरीत तिचा सामना हॉँगकॉँगच्या टेझ का चानसोबत होईल. दुस-या फेरीत तिच्यासमोर जगातील सहाव्या क्रमांकाची महिला खेळाडू वांग शियानचे तगडे आव्हान असेल. महिला एकेरीच्या पात्रता फेरीत पुण्याची सायली गोखले अपयशी ठरली. तिला मुख्य फेरीची पात्रता पूर्ण करता आली नाही. स्थानिक खेळाडू या चिंग हुसने मंगळवारी सायलीला 21-23, 21-10, 21-10 ने पराभूत केले.

पुरुष दुहेरीत भारताच्या तरुण कोना-अरुण विष्णू या जोडीचा पहिल्या फेरीत व्हिएतनामच्या बाओ डुस डुयोंग - होंआंग नाम न्यूगेनसोबत सामना होणर आहे. दुसरीकडे दुहेरीत भारताचे प्रतिनिधीत्व करणाºया प्रणव जेरी चोप्रा व अक्षय देवालकर्मसमोर पहिल्या फेरीत डॅनी बावा ख्रिस्टियन- लुई यूच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.