आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • P Kashyap Bags Gold For India After 32 Years News In Marathi

बालपणी पाहिलेले 'सुवर्ण' स्वप्न साकार झाले, देशास साजेशी कामगिरी करणार - पी. कश्यप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लासगो - राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे माझे बालपणीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आगामी पाच वर्षे मी खेळत राहून देशाच्या नावलौकिकास साजेशी कामगिरी करणार आहे, अशी प्रतिक्रिया सुवर्णपदक विजेता बॅडमिंटनपटू पी.कश्यपने दिली. त्याने तब्बल 32 वर्षांनंतर राष्ट्रकुलच्या बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. भारताचा युवा खेळाडू पी.कश्यपने स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आणि पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत सिंगापूरच्या डॅरेक वोंगचा पराभव करून सुवर्णपदक आपल्या नावे केले. त्याने कोर्टवर शर्ट काढून या सोनेरी यशाचा विजयी जल्लोष केला. या स्पर्धेतील भारताचे हे 15 वे सुवर्णपदक ठरले.

‘मोठय़ा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचे माझे स्वप्न होते. आता मिळवले यश हे माझ्यासाठी स्वप्नपूर्तीसारखे आहे. लहानपणापासूनच मी देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न मला पूर्ण करता आले. माझ्यासाठी हे पदक फार महत्त्वाचे आहे,’ असेही कश्यप म्हणाला. चार वर्षानंतर होणार्‍या या स्पर्धेत मिळवलेले पदक अविस्मरणीय कामगिरीसारखे आहे, असेही तो म्हणाला.

यापूर्वी, पुरुष एकेरीत प्रकाश पदुकोनने 1978 मध्ये आणि सय्यद मोदीने 1982 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.

‘या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर मी फक्त सुवर्णपदक जिंकण्याचे ध्येय निश्चित केले होते. यात मला पूर्ण क्षमतेसह खेळता आले नाही. मात्र, तरीही मी फायनल गाठली. मी हे पदक जिकूंन अधिकच खुश आहे. तसेच मागील अनेक मोठय़ा स्पर्धेतील सलगच्या अपयशाचा दुष्काळही आता मला दूर करता आला. या स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी मी अधिकच उत्सुक होतो,’असेही त्याने या वेळी सांगितले.
(फोटोओळ - विजयानंतर टी शर्ट काढताना कश्‍यप)
पुढील स्‍लाइडवर पाहा, लढतीदरम्‍यानचे चुरसीचे क्षण