आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • P Kashyap, PV Sindhu Reach 2nd Round Of Badminton Asia Championship

संघर्षपूर्ण विजयासह पी. कश्यप दुस-या फेरीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ताइपै- लंडन ऑलिम्पिकचा क्वार्टर फायनलिस्ट भारताच्या पी. कश्यपने आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरीच्या दुस-या फेरीत धडक दिली आहे. चौथा मानांकित पी. कश्यपने पहिल्या फेरीत दक्षिण कोरियाच्या जी. हून होंगला 18-21, 21-15, 22-20 ने हरवले.

जी हून होंग आणि कश्यप यांच्यातील हा दुसरा सामना होता. कश्यपने 2009 मध्ये याच स्पर्धेत होंगला नमवले होते. आता पुढच्या फेरीत त्याचा सामना ताइपैच्या हान चोऊ चू याच्याशी होईल. या दोघांतील हा पहिला सामना असेल. महिला गटात प्रांद्या गदरे आणि अश्विनी पोनप्पा यांनीसुद्धा दुस-या फेरीत प्रवेश केला आहे. या जोडीने चीनी-तैयपैच्या पी रोंग वोंग आणि सिंग यिन युयेन यांना 21-19, 21-17 ने हरवले. महिला दुहेरीत भारताची दुसरी जोडी अपर्णा बालन आणि सिकी रेड्डी यांचा पराभव झाला.