आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • P Kashyap Started With Victory In Badminton Asia

बॅडमिंटन अाशिया चॅम्पियनशिप : पी. कश्यपची चॅम्पियनशिपमध्ये विजयी सलामी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वुहान - राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या पी. कश्यपने मंगळवारी बॅडमिंटन अाशिया चॅम्पियनशिपमध्ये दमदार सुरुवात केली. त्याने स्पर्धेत शानदार विजयी सलामी देऊन भारतीय संघाकडून खाते उघडले. भारताच्या युवा खेळाडू कश्यपने पुरुष एकेरीच्या सलामी सामन्यात सिंगापूरच्या झी लियांग डॅरेक वाेंगवर सरळ दाेन गेममध्ये मात केली.
त्याने २१-१७, २१-१३ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. यासह त्याने ३९ मिनिटांत दुस-या फेरीत दिमाखदारपणे प्रवेश केला. हैदराबादच्या या २८ वर्षीय खेळाडूला अाता दुस-या फेरीत चीन-तैपईच्या या चिंग हूच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल.
सिंधूचे अाज पुनरागमन
जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानावर असलेली पी. व्ही. सिंधू बुधवारी स्पर्धेत दमदार पुनरागमन करणार अाहे. अाठव्या मानांकित सिंधूला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली. गत महिन्यातील अपयशातून सावरलेली भारतीय युवा खेळाडू स्पर्धेत दमदार सुरुवात करण्यासाठी उत्सुक अाहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील दाेन वेळच्या कांस्यपदक विजेत्या सिंधूला दुस-या फेरीत उझबेकिस्तानच्या अनैत खुरशुद्यानविरुद्ध सामना खेळावा लागेल. यात बाजी मारण्याचा भारतीय खेळाडू सिंधूचा प्रयत्न असेल.

कश्यपचा वाेंगविरुद्ध दबदबा
भारताच्या पी. कश्यपने सिंगापूरच्या डॅरेक वाेंगविरुद्ध सामन्यात नेहमी अापले वर्चस्व सिद्ध केले अाहे. हाच दबदबा कायम ठेवताना कश्यपने अाता वाेंगविरुद्ध ४-२ अशी विजयी अाघाडी घेतली. अातापर्यंत या दाेन्ही खेळाडूंमध्ये सहा लढती झाल्या. त्यात भारताच्या खेळाडूने चार अाणि वाेंगने दाेन वेळा विजय संपादन केला.

सायनाला पुढे चाल
जगातील नंबर वन सायना नेहवालला महिला एकेरीच्या पहिल्या अाणि दुस-या फेरीत पुढे चाल मिळाली अाहे. त्यामुळे अाता तिला तिस-या फेरीतील सामन्यातून विजेतेपदाच्या अापल्या माेहिमेला सुरुवात करावी लागेल. जपानच्या नाेझाेमी अाेकुहाराला तिस-या फेरीत जगातील नंबर वन सायनाच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल.