आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅडमिंटन : सिंधू, कश्यप तिस-या फेरीत, अवघ्या १६ मिनिटांत सिंधू जिंकली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वुहान (चीन) - आठवी मानांकित भारताची खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विजेता पी. कश्यप यांनी बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपच्या तिस-या फेरीत प्रवेश केला आहे. जखमी असल्यामुळे सिंधू गेले काही दिवस खेळापासून दूर होती. तिने शानदार विजयासह पुनरागमन केले.

सिंधूने महिला एकेरीच्या दुस-या फेरीत उझबेकिस्तानच्या अनायत खुर्शदियानला २१-६, २१-५ ने हरवले. सिंधूने उझ्बेकच्या खेळाडूचे आव्हान अवघ्या १६ मिनिटांत मोडून काढले. पुरुष एकेरीत कश्यपने एक तास आणि ५३ मिनिटे चाललेल्या सामन्यात चीन तैपेईच्या जेन हाओ सू याला १५-२१, २१-१८, २१-१९ ने मात दिली. जागतिक क्रमवारीत १४ व्या क्रमांकावर असलेल्या कश्यपसाठी हे आव्हान तसे सोपे ठरले नाही. तिस-या फेरीत त्याला एकेका गुणासाठी संघर्ष करावा लागला. आता त्याचा सामना सातवा मानांकित चीनच्या वांग झेनमिंगशी होईल. जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकाच्या वांगविरुद्ध भारतीय खेळाडू कश्यपचा रेकॉर्ड तसा चांगला राहिलेला नाही. या चिनी खेळाडूकडून त्याचा तीन वेळा पराभव झाला आहे.

इतर लढतीत अक्षय देवाळकर आणि जेरी प्रणव या जोडीला पुरुष दुहेरीच्या दुस-या फेरीत चौथी मानांकित जपानची जोडी हिरोकी अँडो आणि केंचई हायाकावाने ३६ मिनिटांत २१-१५, २१-१७ ने पराभूत केले.
बातम्या आणखी आहेत...