आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाशिया चॅम्पियनशिप - सायना, सिंधूची अागेकूच; कश्यपचे अाव्हान संपुष्टात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वुहान - जगातील नंबर वन सायना नेहवाल अाणि पी.व्ही. सिंधूने गुरुवारी बॅडमिंटन अाशिया चॅम्पियनशिपमधील अापल्या विजेतेपदाच्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. भारताच्या या दाेन्ही युवा खेळाडूंनी शानदार विजयासह स्पर्धेत अागेकूच केली. दुसरीकडे जागतिक क्रमवारीत चाैथ्या स्थानावर असलेल्या पी. कश्यपला अापले अाव्हान कायम ठेवता अाले नाही. तिसऱ्या फेरीतील पराभवासह त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

सायनाचा ६७ मिनिटांत विजय
लंडन अाॅलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत बाजी मारली. तिने ६७ मिनिटांमध्ये राेमहर्षक विजयाची नाेंद केली. तिने जपानच्या नाेझाेमी अाेकुहारावर २१-१४, १०-२१, २१-१० ने मात केली. सायनाचा सामना पाचव्या मानांकित त्झु यिंग ताईशी हाेईल.

कश्यपची झंुज अपयशी : राष्ट्रकुल चॅम्पियन पी. कश्यपची झुंज अपयशी ठरली. त्याला सातव्या मानांकित झेंगमिंगने सरळ दाेन गेममध्ये धूळ चारली. झेंगमिंगने २१-२३, २१-१७, २१-८ ने विजय संपादन केला.
सिंधूचा एकतर्फी विजय
जागतिक स्पर्धेतील दाेन वेळची कांस्यपदक िवजेत्या सिंधूने तिसऱ्या फेरीत एकतर्फी विजयाची नाेंद केली. तिने मकाऊच्या तेंग अाेकला २१-८, २१-९ अशा फरकाने धूळ चारली. यासह तिने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. अाता भारताच्या युवा खेळाडूला अंतिम अाठमध्ये अव्वल मानांकित ली झुईरुईच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल.