आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या टेनिसपटूंची लिएंडर पेसविरुद्धची नाराजी कायम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- भारताच्या टेनिसपटूंमधील वादातून निर्माण झालेली दुफळी अजूनही कायम असल्याचे दिसून येते. दोन आठवड्यांपूर्वी वाद संपुष्टात आल्यानंतरही तिघांमधील वैर तसेच कायम असल्याचे उदाहरण विम्बल्डन स्पर्धेदरम्यान दिसून आले. त्यामुळे या चौघांमधील वाद कायम असल्याचे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. लिएंडर पेससोबतचे सानिया मिर्झा, रोहन बोपन्ना व महेश भूपती यांचे संबंध अजूनही दुरावलेले असल्याचे दिसून आले.
पुरुष एकेरीत इंग्लंडचा अ‍ॅँडी मुरे व स्विसचा रॉजर फेडरर यांच्यातील फायनलच्या सामन्यादरम्यान भारताचे सानिया, बोपन्ना व भूपती हे तिघेही ट्विट करत होते. प्रत्येक सेटदरम्यान त्यांनी फेडररला चिअर्स करणारे ट्विट केले. तीन तास रंगलेल्या या सामन्यापर्यंत त्यांनी आपले ट्विट करणे कायम ठेवले. त्यानंतर त्यांनी विजेत्या फेडररचे कौतुक करून शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यानंतर मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली. यामध्ये भारताचा लिएंडर पेस रशियाच्या एलेना वेस्निना व अमेरिकेचे ब्रायन माइक-लिसा रेमंड ही जोडी खेळत होती. दरम्यान, या तिघांनीही ट्विट बंद केले. त्यांनी पेसला कोणत्याही प्रकारचे चिअर्सअप केले नाही. यावरून या चौघांमधील असलेला वाद दूर झालेला नसल्याचे स्पष्ट झाले.
पेसने आगामी लंडन आॅलिम्पिकमध्ये महेश भूपतीसोबत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. यावरून मोठे वादंग निर्माण झाले होते. या वेळी पेटलेल्या वादामुळे भारतीय टेनिस महासंघासमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. दरम्यान, सानिया मिर्झाने पेसविरुद्ध कुरबुरी करणारे आरोप करून वादाचा भडका उडवला होता. या वादातून आॅलिम्पिकमध्ये खेळणार नसल्याची धमकी पेसने दिली होती. यातूनच भारतीय टेनिस महासंघ मोठ्या अडचणीत सापडला होता. महासंघाच्या पथक लंडनमध्ये अखेर पेसची समजूत काढली. त्यानंतर या वादावर पडदा पडला अन् पेसने आॅलिम्पिकमध्ये विष्णू वर्धनसोबत खेळण्याचे मान्य केले.
त्यामुळे संबंधांमध्ये तणाव : सानिया
ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या निवड वादावरून पेस व महेश भूपती यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. यामध्ये कोणाचाही फायदा नाही. या वादामुळे दोघांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे, असे सानिया मिर्झाने स्पष्ट केले. आगामी लंडन आॅलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यास काही दिवस शिल्लक आहेत. मात्र भारतीय टेनिसपटूंमधील वाद काही केल्या मिटेनासा झाला आहे. त्यांच्यातील अंतर्गत वादामुळे सध्या टेनिसमधील वातावरण बिघडले आहे. विम्बल्डन टेनिस स्पर्धा झाल्यानंतर सानिया मिर्झाने शब्दाचे तीर सोडण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे ऐन आॅलिम्पिकच्या तोंडावर नव्या वादाचा भडका उडतो की काय, याबाबत चर्चा केली जात आहे. सानिया मिर्झा व भूपतीने गेल्या महिन्यात फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचा किताब पटकावला. त्यामुळे आॅलिम्पिक स्पर्धेतही भूपतीसोबत खेळण्याची तिला आशा होती. मात्र पेसच्या अट्टहासामुळे तिच्या आशांवर पाणी फेरले गेले. त्यामुळे तिला आपला जोडीदार बदलावा लागला.
पेसची नाही घेतली भेट!- लंडन येथे झालेल्या विम्बल्डंन टेनिस स्पर्धेदरम्यान, आपण पेसची भेट घेतली नसल्याचा गौप्यस्फोट सानियाने केला.
लिएंडर पेस टॉप-5 मध्ये दाखल- भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेसने एटीपीच्या टॉप-5 मध्ये धडक मारली. मात्र दुसरीकडे भारताच्या सानिया मिर्झाची मानांकनात मोठी घसरण झाली. रशियाच्या एलेना वेस्निनासोबत त्याने विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले. तसेच चेक गणराज्याच्या रादेक स्टेपानेकसोबत त्याने पुरुष दुहेरीच्या तिसºया फेरीपर्यंतचा पल्लाही यशस्वीपणे गाठला होता. या धडाकेबाज कामगिरीमुळे क्रमवारीत त्याला दोन स्थानांचा फायदा झाला. सातवरून तो आता पाचव्या स्थानावर विराजमान झाला आहे. पेसचे 6335 रेटिंग गुण झाले आहेत.
अझारेंका अव्वल स्थानावर डब्ल्यूटीएच्या क्रमवारीत बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाने नबर वनचे सिंहासन पटकावले आहे. तिने मारिया शारापोवावर कुरघोडी केली. दुसºया स्थानावर रंदवास्का असून शारापोवा तिसºया स्थानावर आली आहे. सेरेनाने चौथ्या स्थानावर धडक मारली.
नंबर वनचे सिंहासनही मिळवले गेल्या काही वर्षांत स्पेनचा राफेल नदाल आणि सर्र्बियाच्या नोवाक जोकोविच यांच्या थरारासमोर फेडरर संपला, असे बोलले जायचे. मात्र, टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देताना फेडररने 17 व्या ग्रँडस्लॅमसह पुन्हा नंबर वनचे सिंहासनही पटकावले आहे.