आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिएंडर पेस-स्तेपानेक जोडीला यूएस ओपनचे विजेतेपद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- भारताचा टेनिसपटू लिएंडर पेस आणि चेक गणराज्यच्या रादेक स्तेपानेक जोडीने यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले.

रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात या जोडीने ऑस्ट्रियाच्या अलेक्झांडर पेया व ब्राझीलच्या ब्रुनो सोरेस या जोडीचा 6-1, 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. 40 वर्षीय लिएंडर पेसचे हे 14 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.