आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणा, कर्नाटक संघाची विजयी सलामी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पायका युवा क्रीडा व खेळ अभियान अंतर्गत साई येथे आयोजित 4 थ्या राष्ट्रीय ग्रामीण स्पर्धेत हॉकीमध्ये हरियाणा, मिझोरम, तामिळनाडू संघाने पहिल्या दिवशी विजयी सलामी दिली. तसेच हँडबॉलमध्ये कर्नाटक, बिहार, हरियाणा संघाने विजय संपादन केले आहे. स्पर्धेत 22 राज्यातील एकूण 1200 खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन ब्रिगेडियर सुंदर पावामनी (स्टेशन कमांडर, 97 आर्टिलरी ब्रिगेड) यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पोलिस आयुक्त संजय कुमार, संचालक डॉ. एल.एस.राणावत, महाराष्ट्र बॅँकेचे अरुण राजे, साई संचालक श्याम सुंदर, कर्नल अनविंद मोनी, साहाय्यक संचालक वीरेंद्र भांडारकर यांची उपस्थिती होती. हॉकीमध्ये मुलींच्या गटात हरियाणा संघाने शानदार खेळ करत मध्य प्रदेशवर 4-1 ने मात केली. लढतीत एमपीच्या 19 क्रमांकाची जर्सी घालण्या-या सीमा वर्माने संघाला पाच मिनिटांत पहिला गोल करून आघाडी मिळवून दिली. त्यांची आघाडी जास्त वेळी राहिली नाही. हरियाणाच्या 8 व्या क्रमांकाची खेळाडू नवप्रीतने 18 व्या मिनिटांत संघाचा पहिला गोल करून बरोबरी साधली. तसेच लगेच 10 क्रमांकाची खेळाडू नविंदरने 19 व्या आणि 23 मिनिटांत सलग गोल नोंदवून पहिल्या हाफमध्ये 3-1 ने आघाडी घेतली. दुस-या हाफ मध्ये मध्य प्रदेशच्या संघाने जोरदार खेळ करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. या वेळी संधीचा फायदा घेत हरियाणाच्या गीताने 4 था विजयी गोल डागला. दुस-या लढतीत मिझोरमने छत्तीसगडला 5-0ने नमवले. तामिळनाडूने ओरिसाला 2-0ने पराभूत केले तर पंजाबने उत्तराखंडवर 5-2 ने विजय मिळवला.
हॉकीपटू वैद्यकीय चाचणीत दोषी
हॉकीचे काही खेळाडू वैद्यकीय चाचणीमध्ये दोषी आढळल्याने त्यांच्यावर खेळण्यास बंधन घालण्यात आले आहे. त्याचे रिपोर्ट लवकरच हाती येतील त्यानंतर पुढील विचार करण्यात येईल. अशा खेळाडूंवर वेळीच बंधन घालणे आवश्यक आहे. चुकीचे खेळाडू न खेळवण्याची जबाबदारी संघटनाची आहे, असे साईचे सहायक संचालक वीरेंद्र भांडारकर यांनी सांगितले.

औरंगाबादच्या केंद्रात सुविधा वाढवणार
जिल्ह्यात खेळाचे चांगले वातावरण आहे. येथे उत्कृष्ट खेळाडू निर्माण झाले आहेत. औरंगाबाद साईचे अ‍ॅथलेटिक्स सिंथेटिक्स ट्रॅक, हॉकी अ‍ॅट्रोटफचे प्रस्ताव विचाराधीन आहेत, ते लवकर मान्य होईल. गरजेनुसार प्रस्तावाला प्राधान्य दिले जाते. याठिकाणी अत्याधुनिक फिटनेस सेंटर तयार करण्यात आले असून उच्च दर्जाचे होस्टेलचे काम पूर्ण होत आहे.
श्याम सुंदर, साई संचालक, पश्चिम विभाग