आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Painter Sawant Paint Bharatratna Sachin A New Manner

चित्रकार सावंत यांची ‘भारतरत्न’ सचिनला चित्रबद्ध शाबासकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सचिन तेंडुलकर या भारताच्या विश्वविख्यात क्रिकेटपटूला दिल्लीत भारतरत्न या किताबाने सन्मानित करण्यात आले. त्या निमित्ताने चाहत्यांच्या विनंतीवरून, सचिनचा जीवनपट प्रफुल्ल सावंत या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नाशिकच्या एका चित्रकाराने आपल्या कुंचल्याने चित्रबद्ध केला आहे. सचिनच्या निवासस्थानात, ही अजरामर कलाकृती या महिन्यातच पाहावयास मिळेल.
मास्टर ब्लास्टर, विक्रमादित्य, खासदार, एअरफोर्स कॅप्टन, टपाल तिकीट आणि कुटुंबवत्सल सचिन कुंचल्याद्वारे रंगवण्यात आला आहे. जागेअभावी सचिनला घडवणारा आणि सचिनचे विश्वविख्यात क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न त्याच्यासह जगणारा अजित तेंडुलकर याला या चित्रात स्थान देता आले नाही, याबाबत चित्रकार प्रफुल्ल सावंत यांनी खंत व्यक्त केली. सचिनची कर्मभूमी वानखेडे स्टेडियमलाही या चित्रात त्यामुळे स्थान मिळाले नाही, असेही ते पुढे म्हणाले.
या महिन्यातच हे चित्र सचिनच्या घरच्या दिवाणखान्यात लागलेले पाहावयास मिळेल. या चित्राची किंमत सांगण्याचे चित्रकाराने टाळले. या चित्रात सचिनची सर्वश्रूत अशी धीरगंभीर स्थितप्रज्ञ भावमुद्रा चित्रकाराने आपले कौशल्य पणाला लावून अत्यंत वास्तववादी प्रयत्न केला आहे. भोवतालच्या कॅन्व्हासच्या ‘स्पेस’ या चौकटीत, सचिनचे भावविश्व, जीवनपट दाखवताना कलात्मक पद्धतीने वापरली आहे.
सचिनच्या जडणघडणीत मानाचे स्थान असलेले त्याचे वडील रमेश तेंडुलकर, आई रजनी तेंडुलकर, पत्नी अंजली यांना मोक्याच्या जागी स्थान देण्यात आले.
लंडनमध्ये चित्र
प्रा. प्रफुल्ल सावंत यांनी यापूर्वी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम, सुभाषचंद्र बोस, कवी प्रदीप यांसारख्या भव्य व्यक्तिमत्त्वांच्या बायोग्राफिकल पेंटिंग चितारल्या असून सध्या लंडन येथे संग्रहित आहेत. त्यांना आजपर्यंत 45 राष्ट्रीय, 17 आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली आहेत.