आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pak Cricketer Malik, Akmal Can't Elect To World Cup 2015

मलिक,अकमलला पाकच्या विश्वचषक संघातून डावलले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - फेब्रुवारी महिन्यापासून प्रारंभ होणाऱ्या ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील विश्वचषकासाठी पाकसि्तानने त्यांचा संघ जाहीर केला असून या संघात शोएब मलिक आणि कामरान अकमलला डावलण्यात आले आहे. कप्तान मसिबाह उल हक आणि प्रशिक्षक वकार युनूस यांच्या मार्गदर्शनाखाली या १५ सदस्यीय संघाची निवड करण्यात आली.

पाकच्या संघातदेखील युवा खेळाडूंवरच अधिक विश्वास टाकण्यात आला आहे. निवडलेल्या १५ खेळाडूंपैकी शोएब मकसूद, हॅरसि सोहेल, जुनेद खान, मोहंमद इरफान, सोहेल खान, एहसान अदिल आणि यासीर शहा यांनी तर अद्याप एकदाही ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडचा दौरा केलेला नाही. या निवडीबाबत बोलताना निवड समितीप्रमुख असलेल्या मोईन खानने कोणताही पूर्वग्रह न बाळगता केवळ खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे ही निवड करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. नवखा सोहेल खान आणि अनुभवी मोहंमद सामी यांच्यात निवड करणे अवघड होते. मात्र, तिकडच्या स्थितीत पूर्ण भरातला वेगवान गोलंदाजच घ्यायचा हा निकष डोक्यात ठेवून सोहेल खानची निवड करण्यात आली.
आयसीसीची गोलंदाजीवर बंदी असतानाही मोहंमद हाफिजची संघात निवड
पाक संघ
: मसिबाह उल हक (कप्तान), मोहंमद हाफिज, अहमद शेरजाद, युनसि खान, हॅरसि सोहेल, उमर अकमल, शोएब मकसूद, सर्फराज अहमद, शाहीद आफ्रिदी, जुनेद खान, मोहंमद इरफान, सोहेल खान, वहाब रियाज, एहसान अदिल, यासीर शहा.