आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pak cricketer saeed ajmal s bowling action under scanner

इतिहास निर्माण करूनही 'कमनशिबी' ठरतोय हा खेळाडू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- पाकिस्‍तान आणि इंग्‍लंड दरम्‍यान होणा-या सामन्‍यांना वादाचे ग्रहण लागल्‍याचे दिसते. वर्ष 2010 मध्‍ये झालेला दौरा 'स्‍पॉट फिक्सिंग'मुळे चर्चेत आला होता तर आता सईद अजमलच्‍या गोलंदाजी शैलीवरूनही वाद निर्माण झाला आहे.

फिरकीपटू सईद अजमलने दुबई येथे सुरू असलेल्‍या पहिल्‍या कसोटीतील पहिल्‍या दिवशी इंग्‍लंडचे सात गडी 55 धावात तंबूत धाडले होते. त्‍याच्‍या गोलंदाजीमुळे इंग्‍लंडचा डाव 192 धावात आटोपला होता.

विशेष म्‍हणजे, इंग्‍लंडने अजमलच्‍या गोलंदाजी शैलीवरून आक्षेप नोंदवलेला नाही. इंग्‍लंडचा माजी कर्णधार बॉब विलिसने अजमलच्‍या गोलंदाजी शैलीवर शंका व्‍यक्‍त केली आहे. इंग्‍लंड संघ आपल्‍या गोलंदाजांना 'दुसरा' टाकण्‍याचे प्रशिक्षण न देण्‍याची चूक करत असल्‍याचे त्‍याने म्‍हटले.

यावेळेस विलिस यांनी 'दुसरा' विषयी आपला आक्षेप नोंदवला. आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गोलंदाजांना 'दुसरा' टाकण्‍यास परवानगी दिली आहे. या नियमामुळे गोलंदाज आपला हात 15 डिग्रीपर्यंत वळवू शकतात. त्‍यांच्‍या या शैलीमुळे फलंदाजांना चेंडू खेळताना त्रास होतो, असे
विलिस यांनी म्‍हटले.

विलिस यांनी जरी अजमलच्‍या शैलीविषयी प्रश्‍नचिन्‍ह उभे केले असले तरी, इंग्‍लंडचा यष्‍टीरक्षक फलंदाज मॅट प्रायरने पहिल्‍या डावातील अपयशास
फलंदाजास जबाबदार धरले आहे. फलंदाजांना अनुकूल असलेल्‍या खेळपट्टीवर आमच्‍या फलंदाजांनी नांगी टाकली, असे तो म्‍हणाला.

गोलंदाजी शैलीबाबत करण्‍यात आलेल्‍या आरोपांकडे दुर्लक्ष करणार असल्‍याचे अजमलने यावेळेस म्‍हटले. माझी गोलंदाजी शैली अवैध ठरवण्‍याचा अधिकार पंच आणि सामनाधिका-यांना आहे. माझ्या कारकीर्दीतील हे सर्वश्रेष्‍ठ प्रदर्शन होते, असेही त्‍याने यावेळेस सांगितले.