आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथ्या सामन्यात पाकिस्तानची आफ्रिकेवर मात, मालिका बरोबरीत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डरबन- पाकिस्तानने गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा वनडे जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली. पाकने चौथ्या वनडेत 3 गडी व 8 चेंडू राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना यजमान दक्षिण आफ्रिकेने 9 बाद 234 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकने 7 गड्यांच्या मोबदल्यात 48.4 षटकांत लक्ष्य गाठले. इमरान फराहत 93 व कर्णधार मिसबाहने 80 धावा काढून पाकच्या विजयात योगदान दिले. येत्या रविवारी पाक-आफ्रिका यांच्यातील निर्णायक पाचवा वनडे बेनोनी येथे होईल.