आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक-विंडीज वनडे मालिका होती फिक्स , ‘द मेल’ ची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्यात नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत फिक्सिंगची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘द मेल’ने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान आणि वेस्ट इंडीजदरम्यान कॅरेबियन भूमीवर झालेल्या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत फलंदाजीवर शंका निर्माण केली जात आहे. या मालिकेची चौकशी होऊ शकते. ही मालिका पाकने 3-1 ने जिंकली होती आणि एक सामना टाय झाला होता.

अहवालानुसार काही षटके स्लो रनरेटने खेळली गेले. याचा परिणाम स्कोअरवर झाला. यासह मालिकेतील एक सामना टाय झाला. यावर फिक्सिंगची शक्यता असल्याचे बोलले जाते. इतकेच नव्हे तर दुसर्‍या वनडेत पाक फलंदाजीवरही प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहेत.

‘बुकी गँबलर, फिक्सर, स्पाय’चे लेखक एड. हॉकिन्स यांनी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत काही प्रश्‍न निर्माण केले. ‘या मालिकेत ज्याप्रमाणे फलंदाजी झाली, त्यामुळे प्रश्‍न निर्माण होणे साहजिक आहे. पाक आणि विंडीज यांच्यात जो सामना टाय झाला, त्यात तर शंका घेण्यासारखे अनेक क्षण होते,’ असे ते म्हटले.


विंडीजचा सुपडा साफ
किंग्जस्टन 2 वनडे मालिकेत 3-1 ने सपाटून मार खाणार्‍या यजमान वेस्ट इंडीजवर टी-20 मालिकेतही पराभवाची नामुष्की ओढवली. पाककडून विंडीजला 11 धावांनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करणार्‍या पाकने 7 बाद 135 धावा काढल्या. कॅरेबियनांना 9 गडी गमावून 124 धावा काढता आल्या. यासह पाकने क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर धडक मारली. वेस्ट इंडीजची चौथ्या स्थानावर घसरण झाली.