आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकच्या विजयात मिसबाह, हाफिज हीरो, विंडीजला पावसाचा फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रॉस आइसलेट- मिसबाह (53) व मो. हाफिजच्या (59) अर्धशतकांच्या बळावर पाकिस्तानने वेस्ट इंडीजवर चौथ्या वनडेत डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे सहा गड्यांनी मात केली. यासह पाकने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. शेवटचा वनडे बुधवारी होणार आहे.
पावसामुळे सामना 49 षटकांचा करण्यात आला. यजमानांनी 7 बाद 261 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. मात्र पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने पाकला 31 षटकात 189 धावांचे सुधारित आव्हान मिळाले. ड्वेन ब्रावो या निर्णयामुळे हताश झाला होता. दुसरीकडे पाहुण्या पाकने 30 षटकांत चार गडी गमावून विंडीजचे लक्ष्य आरामात पार केले. पाककडून शहजाद (14), जमशेदने 22, धावांची खेळी केली. विंडीजकडून होल्डर, रोच व ब्राव्होला प्रत्येकी एक बळी मिळाला.सॅम्युअल्सचे शतक व्यर्थ
मार्लोन सॅम्युअल्सने (106, 9 चौकार, 4 षटकार) शतक काढून संघाला अडीचशे (261) पार नेले. मात्र पावसाने पाणी फिरवले. तरीही शानदार खेळीमुळे सॅम्युअल्सला सामनावीराचा बहुमान मिळाला. जॉन्सन चार्ल्स (32), लेंडन सिमन्स (46), गेलने (30) मोलाचे योगदान दिले. पाककडून इरफानने दोन, जुनैद, वहाब, आफ्रिदी, अजमलने प्रत्येकी एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडीज-7 बाद 261 धावा पराभूत वि. पाकिस्तान- 4 बाद 189 धावा.