आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्स्ट्रा कव्हर: पाक खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळू देण्याची अक्रमची बीसीसीआयला विनंती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची - पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने पाकिस्तानी क्रिकेटपटूंना इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळू देण्याची विनंती केली आहे. पाक खेळाडूंच्या समावेशामुळे ही स्पर्धा अधिक रंजक होईल. खेळ आणि राजकारण या दोघांना वेगवेगळेच ठेवले पाहिजे, हे मी सुरुवातीपासून म्हणतो. यावर मी आजही ठाम आहे. आमच्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये सहभाग घेतल्यास स्पर्धेचा दर्जा वाढेलच, असे अक्रम म्हणाला. पहिल्या आयपीएलनंतर दोन्ही देशांतील तणावाच्या स्थितीमुळे पाक खेळाडूंनी आयपीएलमध्ये खेळण्यास मनाई करण्यात आली. पाकचे पंच, समालोचक, कोच आयपीएलमध्ये सहभागी होत आहेत. मात्र, खेळाडूंचा सहभाग का नाही, असेही त्याने नमूद केले.