आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँडरसनच्या बाऊंसरने पाकिस्तानी फलंदाजाच्या डोक्यात फ्रॅक्चर, विक्रम रचून आऊट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अबूधाबी - न्यूझीलंडच्या कोरी अँडरसनच्या बाउंसरच्या सामना करताना पाकिस्तानी स्टार फलंदाज शहजादच्या डोक्याला चेंडू लागला आणि तो जायबंदी झाला आहे. तेव्हा शहजात 176 धावांवर खेळत होता. चेंडू डोक्याला लागल्यामुळे वेदनेने विव्हळत तो जमीनीवर पडला आणि त्याची बॅट हातातून निसटून स्टम्प्सला लागली, त्यामुळे त्याला हिट विकेट आऊट देण्यात आले.
विक्रम करुन आऊट
150 पेक्षा जास्त रन करुन हिट विकेट आऊट होणारा अहमद शहजाद आशियातील पहिला आणि संपूर्ण क्रिकेट जगतातील सहावा फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाचा बिल पोन्सफोर्ड दोन वेळा 150 पेक्षा जास्त रन्सवर हिट विकेट आऊट झालेला आहे. सर डॉन ब्रॅडमन, वेस्ट इंडिजचा फाऊड बाचूस, इग्लंडचा जॅक हॉब्स आणि डेनिस कॉम्प्टन 150 पेक्षा जास्त रन्स काढल्यानंतर दुर्दैवी आऊट झाले होते.
पाकिस्तानचा व्यवस्थापक मोईन खान याने सांगितले, की शहजादच्या डोक्याला हलके फ्रॅक्चर झाले आहे. डॉक्टरांनी त्याला 48 तास काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. या दरम्यान जर त्याला होणारा त्रास कमी झाला नाही, तर ऑपरेशन करावे लागणार आहे.
शहजादने 371 बॉलचा सामना करताना 17 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 176 रन्स केले. त्याचा शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या डावात 3 विकेट गमावत 566 रन्सवर डाव घोषित केला. कर्णधार मिसबाह उल हक 102 आणि युनिस खान 100 रन्सवर नाबाद राहिले. दुसर्‍या दिवशी न्यूझीलंडने एकही गडी न गमावता 15 रन्स केले.
अँडरसनही घाबरला होता
शहजाद बाद झाल्यानंत अँडरसन आनंदीत झाला होता. मात्र, जेव्हा डोक्यात बॉल लागल्यानंतर शहजाद उठला नाही तेव्हा त्याच्या चेहर्‍यावरील आनंद क्षणात मावळला आणि तो चिंताग्रस्त झाला होता.

सामन्यानंतर अँडरसन म्हणाला, 'मोठ्या कष्टाने आम्हाला शहजादची विकेट मिळाली होती. त्यामुळे आम्ही आनंदी झालो होतो. मात्र जेव्हा त्याची अवस्था पाहिली तेव्हा चिंता वाटायला लागली होती. त्यांचा डाव शानदार झाला होता.'
पुढील स्लाइडवर पाहा, शहजाद सोबत झालेल्या दुर्घटनेची छायाचित्र