आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Ex captain Malik Voices World Cup Hopes

भारत वर्ल्डकपचा दावेदार : मलिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - पाकिस्तान संघाने विश्वचषक जिंकावे ही माझी अपेक्षा आहे. मात्र, यंदाच्या विश्वचषकाचा पाकिस्तान नव्हे, भारत प्रबळ दावेदार आहे, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने व्यक्त केले आहे. सईद अजमल आणि मोहंमद हाफिज निलंबनाच्या कारवाईत अडकल्यामुळे पाकचा संघ कमकुवत वाटत आहे. त्यामुळे पाकची दावेदारी कमजोर झाली आहे. विश्वचषक पटकावण्याच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका हे संघही आहेत. मात्र, भारताचा दावा मजबूत आहे, असेही तो म्हणाला.

पाकचा ऑफस्पिनर अजमल सईद आणि मोहंमद हाफिज यांच्यावर आक्षेपार्ह शैलीमुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अजमलने विश्वचषकात खेळणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. पण, हाफिजला फलंदाज म्हणून संघात स्थान मिळू शकते. मात्र, त्यावरही साशंकता कायम आहे. पाकच्या संभाव्य संघाची ७ जानेवारीला घोषणा होईल.

निवड प्रक्रियेवर शोएब नाराज
विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची इतर खेळाडूंप्रमाणे माझीही इच्छा आहे. मागील बर्‍याच काळापासून मी संघातून बाहेर आहे. मात्र माझी पीसीबीच्या निवड प्रक्रियेवर नाराजी आहे. माझ्याबाबत मला स्पष्ट निर्णय हवे, असेही मलिकने या वेळी सांगितले. जून २०१३ मध्ये मलिकने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.