आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेनच्या तुफानापुढे पाक संघ उद्ध्वस्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्सबर्ग - द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या आग ओकणार्‍या गोलंदाजीसमोर पाकिस्तान क्रिकेट संघ अवघ्या 49 धावांत उद्ध्वस्त झाला. पहिल्या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी स्टेनने ही तुफानी कामगिरी केली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 15 व्या वेळी पाक टीम शंभरपेक्षा कमी स्कोअरवर गारद झाली.

पाकिस्तानी फलंदाजांनी लाजिरवाणी कामगिरी केली आणि अख्खी टीम 29.1 षटकांत 49 धावांत ढेपाळली. ही त्यांची नीचांकी धावसंख्या ठरली. यापूर्वी, पाकिस्तानची टीम ऑक्टोबर 2002 मध्ये शारजाह येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 24.5 षटकांत 53 धावांत गारद झाली होती.

स्टेनने घातक गोलंदाजी करताना पाक फलंदाजांची वरात काढली. त्याने अवघ्या 8.1 षटकांत सहा षटके निर्धाव टाकताना 6 गडी बाद केले. स्टेनने मोहंमद हफिज (6), नासेर जमशेद (2), युनिस खान (0), सरफराज अहमद (2), सईद अजमल (1) आणि राहत अली (0) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. वेर्नोन फिलेंडरने 9 षटके गोलंदाजी करताना 16 धावांत 2 गडी बाद केले. ज्ॉक कॅलिसने सहा षटकांत 11 धावांत दोघांना बाद केले. पाकिस्तानकडून फक्त दोघांना दोनअंकी धावसंख्या गाठता आली. अजहर अली (13) आणि मिसबाह-उल-हक (12) यांनी दोनअंकी धावा काढल्या.