आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानकडे 96 धावांची आघाडी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई । येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुस-या दिवशी पाकिस्तानने सलामीवीर मोहम्मद हाफिज (88) आणि तौफिक उमर (58) यांच्या अर्धशतकाच्या बळावर इंग्लंडवर पहिल्या डावात महत्त्वपूर्ण अशी 96 धावांची आघाडी घेतली. सईद अजमलच्या 7 विकेटच्या बळावर इंग्लंडला पहिल्या डावात अवघ्या 192 धावांत रोखल्यानंतर दुस-या दिवसअखेर पाकिस्तानने 7 बाद 288 धावा काढल्या.
पाकिस्तान संघाच्या 3 विकेट अद्याप शिल्लक असून असद शफिक 16 धावांवर खेळत आहे. पाकिस्तानकडून हाफिज आणि तौफिक उमर या सलामीच्या जोडीने शानदार कामगिरी करून 114 धावांची दणकेबाज सलामी दिली. यानंतर मधल्या फळीत युनिस खानने 37, तर कर्णधार मिसबाह उल हकने 52 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि ग्रीम स्वान यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड पहिला डाव 192. पाकिस्तान पहिला डाव 7 बाद 288. (मो. हाफिज 88, तौफिक उमर 58, मिसबाह उल हक 52, 2/57 अँडरसन, 2/72 ब्रॉड.)