आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Vs Sri Lanka Live Cricket Score, Asia Cup 2014

आशिया चषक : श्रीलंकेचा पाकिस्‍तानवर 12 धावांनी विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फतुल्‍लाह (बांगलादेश) - पाकिस्‍तानविरुद्ध श्रीलंका या पहिल्या लढतीत खानसाहेब उस्‍मान अली मैदानावर मंगळवारी आशिया चषकाचा प्रारंभ झाला आहे. प्रारंभीच्या सामन्यात श्रीलंकेने विजयी सुरवात केली आहे. श्रीलंकेने दिलेल्या 296 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानी खेळाडू 48.5 षटकात सर्वबाद 284 पर्यंतच मजल मारू शकले. श्रीलंकेने पाकिस्तानवर 12 धावांनी विजय मिळविला आहे.

प्रथम फलंदाजी करीत श्रीलंका संघाने 6 बाद 296 धावा केल्या. मॅथ्यूज 55 आणि चंडीमल 19 धावांवर नाबाद राहिले.

थिरिमानेचे दमदार शतक
सलामीचा फलंदाज परेरा 14 धावांवर बाद झाल्‍यानंत संगकारा आणि थिरिमानेने खेळाची सुत्रे आपल्‍याकडे घेत एकाग्रतेने खेळी साकारली. थिरिमानेने खणखणीत शतक ठोकत संगकारासोबत आश्‍वासक भागीदारी केली आहे.107 चेंडुमध्‍ये 11 चौकार आणि एक षटकार खेचत आपले शतक साजरे केले. त्‍याला उत्‍तम साथ देत संगकाराने 103.7 च्‍या सरासरीने 65 चेंडूत 8 चौकाराच्‍या सहाय्याने 67 धावांची खेळी केली.

सविस्‍तर बातमी वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा..