आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेस्ट इंडीजविरुद्ध पाकिस्तानचा मालिका विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रास आइलेट- पाकिस्तानने वेस्ट इंडीजविरुद्ध पाचवा आणि अंतिम एकदिवसीय सामना 4 गड्यांनी जिंकून पाच सामन्यांची मालिका 3-1 ने खिशात घातली. 49 व्या षटकातील 5 व्या चेंडूवर होल्डरचा चेंडू सईद अजमलने मिडऑनला टोलवून धाव घेतली. पोलॉर्डचा थ्रो चुकला आणि पाकच्या गोटात जल्लोष सुरू झाला.

पाकच्या रोमहर्षक विजयात कर्णधार मिसबाह उल-हकचे (63) योगदान अमूल्य ठरले. तो प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द सिरीज ठरला. मिसबाहचे माकिकेत 52, 17, 75, 53 आणि 63 असे शानदार प्रदर्शन राहिले.
वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 242 धावा जमवल्या. ड्ॅवेन ब्राव्हो 48, सॅम्युअल्स 45 आणि चार्ल्सच्या 43 धावांनी कॅरेबियनांनी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली.

पाकच्या जुनैद खानने 48 धावांच्या मोबदल्यात तिघांना टिपले. अजमल आणि मो.इरफानने प्रत्येकी 2-2 बळी मिळवले. प्रत्युत्तरात पाकने 49.5 षटकात 6 बाद 243 धावा अशी विजयी मोहोर उमटवली. अहमद शहजाद 64, मिसबाह 63 आणि उमर अकलमच्या 37 धावांनी विजय खेचला. मिस्बाह-अकमलने पाचव्या गड्यासाठी सर्वाधिक 66 धावांची भागीदारी रचली. विंडीजकडून टिनो बेस्टने 48 धावा मोजून 3 बळी घेतले. जेसन होल्डर आणि डॅरेन सॅमीला प्रत्येकी 1 गडी बाद करता आला. या मालिका विजयाने पाकने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

...मात्र रज्जाकचा मिसबाहला यॉर्कर!
कराची । आपल्या जबरदस्त फलंदाजीने कॅरेबियनांना लोळवणार्‍या कर्णधार मिसबाहवर अब्दुल रझ्झाकने मात्र टीकेचा भडिमार केलाय. मिसबाह अतिशय डिफेन्सिव्ह खेळतो. त्यामुळे त्याच्यानंतर येणार्‍या फलंदाजांवर दबाव वाढतो. हाफिज आणि मिसबाहमुळे पाक संघाचा जोश गडप झालाय, असा यॉर्कर रज्जाकने टाकले आहेत.


संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडीज : 7 बाद 242 धावा. ड्ॅवेन ब्राव्हो 48, सॅम्युअल्स 45, चार्ल्स 43 पाकिस्तान : 6 बाद 243 धावा. अहमद शहजाद 64, मिसबाह 63, उमर अकमल 37