आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pakistani All Rounder Cricketer Shahid Afridi Married His Maternal Cousin Nadia.

टीचरच्या प्रेमात पडला होता हा क्रिकेटर, मग मामेबहिणीशी करावे लागले लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानात लोकप्रिय असलेल्या शाहिदला प्रेमाने लाला तसेच बूम बूम आफ्रिदी म्हणतात. - Divya Marathi
पाकिस्तानात लोकप्रिय असलेल्या शाहिदला प्रेमाने लाला तसेच बूम बूम आफ्रिदी म्हणतात.
स्पोर्ट्स डेस्क- पाकिस्तानचा माजी स्फोटक बॅट्समन शाहिद आफ्रिदीने भारताला स्वतंत्रदिनाच्या शुभेच्छा दिल्याने चर्चेत आहे. त्याच्या या कृत्याने सर्वच जण त्याचे कौतूक करत आहेत. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांनी शांती, सहिष्णुता आणि एकमेंकाच्या सामजस्यांसाठी काम करत राहावे, असे त्याने म्हटले. सोबतच 'हॅप्पी इंडिपेंडेंस डे भारत! शेजारी बदलण्याचा कोणताही पर्याय नसतो. या, आपण एकत्र मिळून शांती, सहिष्णुता आणि आपपासातील स्नेहासाठी काम करूया, मानवतेला पुढे नेऊया, ' असेही त्याने टि्वट केले. यानंतर नोबल पुरस्कार जिंकणारी पाकिस्तानची मलाला यूसुफजईने सुद्धा शाहिदच्या समर्थनार्थ एक ट्विट केले. सध्या तो शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजसेवा करतो. टीचरच्या पडला होता प्रेमात... 
 
- एकदा शाहिद आफ्रिदीने स्वतःच खुलासा केला होता की, तो शाळेत शिकत असतानाच प्रेमात पडला होता.
- तो जिच्या प्रेमात पडला ती कुणी दुसरी-तिसरी नसून खुद्द त्यला शिकवणारीच एक शिक्षिका होती.
- त्याने गमतीने असेही सांगितले होते की, ते लहानपण होते. तेव्हा मी केवळ 9 वर्षांचा होतो. 
- मी टीचरच्याच प्रेमात पडलो होतो. ती फार सुंदर होती.
 
मामेबहिणीशी केले लग्न-
 
- शाहिद आफ्रिदी फार ट्रेडिशनल असल्याचे मानले जाते. तो त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल कधीच माध्यमांसमोर बोलत नाही. मात्र जेव्हा-जेव्हा त्याला त्याच्या पत्नी विषयी विचारलेजाते, तो मोठ्या दिलखुलासपणे उत्तरे देतो. 
- एका इंटरव्हूमध्ये शाहिदला त्याच्या लग्नासंदर्भात विचारले असता त्याने सांगितले होते की, एका दौर्‍यावर जाण्याआधी मी माझ्या वडिलांची मजाक केली होती. 
- मी त्यांना म्हणालो होतो की, माझासाठी एक मुलगी बघा. मात्र माझे बोलने त्यांनी जरा जास्तच सिरिअस घेतले.
- जेव्हा मी टोर्नामेंट संपल्यावर परदेशातून पतरलो तेव्हा, ते मला घराच्या गच्चीवर घेऊन गेले आणि म्हणाले की, मी तुझा साखरपुडा उरकला आहे. 
- हे ऐकूण मी शॉक झालो. आश्चर्याची गोष्ट तर ही की, शाहिदची होणारी पत्नी दुसरी- तिसरी कुणी नसून त्याच्याच मामाची मुलगी नादिया होती.
 
लग्नानंतर पहिल्या सामन्यात चमकला-
 
- शाहिद आफ्रिदी आणि नादिया यांचा विवाह 22 ऑक्टोबर, 2000 रोजी झाला. 
- इंग्लंडविरुद्ध सीरीज सुरू होती. शाहिद लग्नाच्य दुसर्‍याच दिवशी टीमसोबत गेला होता.
- लग्नानंतर लाहोरमध्ये झालेल्या या पहिल्याच सामन्यात आफ्रिदीने खळबळ उडवून दिली.
- त्याने या सामन्यात हाफसेंच्युरी करत तब्बल 5 विकेट्स घेल्या. त्याला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले. 
- मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांनीही त्याचे कौतुक केले होते.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, शाहिद आफ्रिदीचे पर्सनल लाईफचे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...