आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Cicketer Raza Hasan Tests Positive For Cocaine

कोकेन सेवनात पाकिस्तानी खेळाडू हसन आढळला दोषी, खेळण्‍यावर येऊ शकते बंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : 2012 मध्‍ये झालेल्या टी-20 विश्‍वचषकात भारताव‍िरुध्‍द पहिल्याच षटकात हसनने विकेट घेतली होती.)

कराची - आंतरराष्‍ट्रीय पातळीवर 10 टी-20 आणि 1 वनडे सामना खेळणारा पाकिस्तानचा क्रिकेटपटू रझा हसन डोप टेस्टमध्‍ये कोकेन सेवनात दोषी आढळला आहे. कराचीत पार पडलेल्या पेंटँग्युलर कप टूर्नामेंटच्या दरम्यान अंमली पदार्थांची चाचणी घेण्‍यात आली होती. हसनवर आता दोन वर्षापर्यंत बंदी घातली जाऊ शकते. त्याला आंतरराष्‍ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट खेळता येणार नाही. नुकत्याच झालेल्या विश्‍वचषकात पराभव झाल्यानंतर काही पाक खेळाडूंवर शिस्तभंगाचा आरोप करण्‍यात आला होता.
भारतीय प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह रिझल्ट
पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) रझा हसनचे सॅम्पल भारतातील प्रयोगशाळेत पाठवले होते. या प्रयोगशाळेला वर्ल्ड अँटी डोपिंग एजेन्सीची (वाडा) मान्यता असून येथेच हसनने कोकेन सेवन केल्याचे स्पष्‍ट झाले.
चौकशी समितीवर होणार हजर
रझाच्या डोप टेस्टच्या सॅम्पल 'ए' ची चाचणी करण्यात आली आहे. यात तो कोकेन सेवनात दोषी आढळला असून याची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यांची समिती स्थापन करण्‍याचा आदेश देण्‍यात आला आहे. रझाच्या सॅम्पल 'बी' ची सत्यता बाहेर येणे शिल्लक आहे. प्रथमच पाकिस्तानचा खेळाडू कोकेन सेवनात दोषी आढळला आहे.

गुन्हा ही दाखल होऊ शकतो
क्रिकेट खेळण्‍यावर बंदीबरोबरच रजावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. पाकिस्तानमध्‍ये कोकेन सेवन करणे हा कायद्याने गुन्हा आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, पाकिस्तानी क्रिकेटपटूवर पूर्वीही सेवनावरुन बंदी घालण्‍यात आली आहे...