आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK च्या \'दागी\' क्रिकेटरने ब्रिटिश मुलीशी केले लग्न, पाहा Wedding Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमिर-नरजिसच्या विवाह समारंभाला पाकिस्तानी क्रिकेटर अजहर अली (डावीकडे)ने हजेरी लावली. - Divya Marathi
आमिर-नरजिसच्या विवाह समारंभाला पाकिस्तानी क्रिकेटर अजहर अली (डावीकडे)ने हजेरी लावली.
लाहोर- पाकिस्तानचा वेगवान बॉलर मोहम्मद आमिरने मंगळवारी (20 सप्टेंबर) लग्न केले. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिरचा लग्नसमारंभ तीन दिवस चालेल. 19 सप्टेंबर रोजी मेहंदीचा कार्यक्रम झाला तर 20 ला वेडिंग तर 21 ला वलीमा झाला. असे असले तरी आमिरचे लग्न दोन वर्षापूर्वीच झाले होते. सप्टेंबर, 2014 मध्ये झाला होता निकाह...
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोहम्मद आमिर आणि नरजिस खान यांचा निकाह 2014 मध्ये झाला होता.
- तेव्हा स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अडकल्याने त्याच्या निकाहाचा कार्यक्रम होऊ शकले नव्हते.
- आता जेव्हा 5 वर्षाची बंदी उठवल्यानंतर आमिर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये परतला आहे. त्यामुळे ही वेडिंग सेरेमनी पुन्हा एकदा धामधूम पद्धतीने होत आहे.
- आमिरच्या माहितीनुसार, ‘आयुष्यात आता सेटल होण्याची वेळ आली आहे. नरजिसने प्रत्येक चांगल्या-वाईट काळात मला साथ दिली.’
अशी सुरु झाली होती लव्ह स्टोरी-
- आमिर आणि नरजिस यांची लव्ह स्टोरी सुमारे 6 वर्षापूर्वी सुरु झाली होती. दोघांची भेट एका फॅमिली इव्हेंटमध्ये झाली होती.
- नरजिस मूळ पाकिस्तानी ब्रिटिश आहे. आमिर-नरजिसची भेट लंडनमध्ये झाली होती.
- आमिरने सांगितले की, ‘हे लव्ह मॅरेज आहे. मात्र, यात दोन्ही कुटुंबांची सहमती आहे. नरजिसने माझ्या सर्वात कठिण काळात मला साथ दिली.’
- 21 सप्टेंबरनंतर वलीमा झाल्यानंतर आमिर दुबईला जाईल. तेथे त्याला वेस्ट इंडिजविरूद्ध 23 सप्टेंबरपासून सुरु होणारी टी-20 सीरीज खेळायची आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मोहम्मद आमिर आणि नरसिजचे वेडिंग फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...