आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोहाली- मोठया मेहनतीने चॅम्पियन्स टी-20च्या क्वॉलिफाय राऊंडपर्यंत पोहोचलेल्या पाकिस्तानच्या फैसलाबाद वुल्व्सला अखेर टुर्नामेंटमधून बाहेर व्हावे लागले आहे. सलग दोन सामन्यात पराभव झाल्यामुळे त्यांचे पुढचे सर्व मार्ग बंद झाले आहेत.
सनरायजर्स हैदराबाद टीमने चौथा क्वॉलिफायिंग सामना 7 विकेटने जिंकून मुख्य टुर्नामेंटसाठी आपली जागा निश्चित केली आहे. मोहालीमध्ये झालेल्या सामन्यात हैदराबादने फैसलाबाद टीमला पराभूत केले. कर्णधार शिखर धवन पुन्हा एकदा विजयाचा हिरो ठरला. त्याने आपल्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानी टीमचे बारा वाजवले. फैसलाबादच्या टीमला एकही सामना जिंकता आला नाही. तर हैदराबादने आपले दोन्ही सामने जिंकून बाजी मारली. पुढच्या स्लाईडला क्लिक करून पाहा शिखर धवनने कसे केले पाकिस्तानला 'गेट आऊट'...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.