आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Women Cricketers Allege Physical Exploitation From Selectors

फिक्सिंगनंतर क्रिकेटमध्‍ये \'प्‍लेईंग काऊच\'ची कीड, संघात समावेशासाठी सेक्‍सची मागणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची- क्रिकेटला फिक्सिंगपाठोपाठ आता 'कास्‍टींग काऊच'प्रमाणे 'प्‍लेईंग काऊच'ची कीड लागू पाहत आहे. पाकिस्‍तानात महिला क्रिकेटपटुंनी निवडकर्त्‍यांवर संघात समावेश करण्‍याच्‍या मोबदल्‍यात शय्यासोबत करण्‍याची मागणी केल्‍याचा आरोप केला आहे. निवड समिती आणि मुलतान क्रिकेट क्‍लबच्‍या अधिका-यांवर 5 खेळाडुंनी हा आरोप केला आहे. आपले लैंगिक शोषण झाल्‍याचा स्‍पष्‍ट आरोप या क्रिकेटपटुंनी एका टीव्‍ही शोमध्‍ये केला. यानंतर पाकिस्‍तानात खळबळ उडाली असून पाकिस्‍तान क्रिकेट मंडळाने चौकशी सुरु केली आहे. संघात समावेश करण्‍यासाठी तसेच बढती देण्‍यासाठी निवड समितीचे सदस्‍य आणि अधिका-यांनी त्‍यांच्‍यासोबत सेक्‍स करण्‍याची मागणी केली.