आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटोकियो- भारताच्या सानिया मिर्झाने शनिवारी झिम्बाब्वेच्या कारा ब्लॅकसोबत पॅन पॅसिफिक ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचा किताब पटकावला. या बिगर मानांकित जोडीने अंतिम सामन्यात चीनच्या हाओ-चिंग चान आणि अमेरिकेच्या लिझेल हुर्बरवर 4-6, 6-0, 11-9 अशा फरकाने विजय मिळवला. सानिया-काराने एक तास 25 मिनिटांत चषकावर नाव कोरले. बीजिंगमध्ये डब्ल्यूटीए प्रीमियर टेनिस लीग होणार आहे. सानिया-कारा या लीगमध्ये खेळणार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.