आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pan Pacific Open Tennis News In Marathi, Anna Ivanovick, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पॅन पॅसिफिक ओपन टेनिसमध्‍ये अ‍ॅना इव्हानोविक ठरली चॅम्पियन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो - जगातील माजी नंबर वन अ‍ॅना इव्हानोविक रविवारी डब्ल्यूटीए टोरी पॅन पॅसिफिक ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत चॅम्पियन ठरली. तिने अंतिम सामन्यात अमेरिकन ओपनच्या फायनलिस्ट कॅरोलिना वोज्नियाकीचा पराभव केला. सर्बियाच्या २६ वर्षीय अ‍ॅनाने ६-२, ७-६ अशा फरकाने सामना जिंकला.

याशिवाय तिने ९९ मिनिटे शर्थीची झुंज देत किताबावर नाव कोरले. तसेच सर्बियाच्या खेळाडूचा डेन्मार्कच्या वोज्नियाकी विरुद्धचा हा पाचवा विजय ठरला. पराभवामुळे जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या वोज्नियाकीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तिने दुस-या सेटमध्ये अ‍ॅनाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, अ‍ॅनाने आक्रमक सर्व्हिसची लय कायम ठेवत ट्रायब्रेकरपर्यंत खेचल्या गेलेला दुसरा सेट आपल्या नावे करून सामना जिंकला.

वोज्नियाकी अपयशी
डेन्मार्कच्या कॅरोलिना वोज्नियाकीने अंतिम लढतीत शर्थीची झुंज दिली. मात्र, तिला समाधानकारक यश संपादन करता आले नाही. तिने स्पर्धेच्या अंतिम १६ मध्ये धडाकेबाज विजयाची नोंद करून महिला एकेरीच्या किताबाचा दावाही मजबूत केला होता. मात्र, तिला तब्बल ९९ मिनिटे रंगलेल्या लढतीत बाजी मारता आली नाही. तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.