आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pan Pacific Open Tennis News In Marathi, Sania Mirza, Divya Marathi

पॅन पॅसिफिक ओपन टेनिस स्पर्धा : सानिया-कारा उपांत्य फेरीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो - गत चॅम्पियन सानिया मिर्झा आणि कारा ब्लॅकने गुरुवारी डब्ल्यूटीए टोरी पॅन पॅसिफिक ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या अव्वल मानांकित जोडीने उपांत्यपूर्व लढतीत मार्टिना हिंगस-बेलिंडा बेनसिसचा पराभव केला. इंडो-झिम्बाव्वेच्या जोडीने ६-४, ६-२ अशा फरकाने सामना जिंकला. याशिवाय सानिया-काराने अवघ्या ६२ मिनिटांत महिला दुहेरीच्या अंतिम चारमधील आपला प्रवेश निश्चित केला.
आता सानिया-कारा या अव्वल जोडीचा उपांत्य सामना सर्बिया-स्पेनच्या जेलेना यांकोविक-सांतोंजाशी होईल. दुसरीकडे महिला एकेरीत सर्बियाच्या जेलेना यांकाेविकला पराभवाचा सामना करावा लागला. तिला स्पेनची युवा खेळाडू गार्बिने मुगुरुझाने सरळ दाेन सेटमध्ये धूळ चारली. स्पेनच्या खेळाडूने ७-६, ६-४ अशा फरकाने सामना जिंकून स्पर्धेच्या तिस-या फेरीत धडक मारली.

कार्ला सुआरेझ तिस-या फेरीत : स्पेनच्या कार्ला सुआरेझने महिला एकेरीची तिसरी फेरी गाठली. तिने दुस-या फेरीत रशियाची दारिया गावरिलोवावर मात केली. स्पेनच्या खेळाडूने ७-६, ६-३ ने सामना आपल्या नावे केला.