आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pankaj Advani News In Marathi, Biliyards Primer League, Divya Marathi

बिलियर्डस प्रीमियर लीगचा खेळाला लाभ - अडवाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बिलियर्डस प्रीमियर लीगसारख्या स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर होणे आवश्यक असून अशा स्पर्धांचा फायदा खेळाला होईल, असा वशि्वास प्रख्यास आंतरराष्ट्रीय बिलियर्डपटू पंकज अडवाणी यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे अडवाणीने कौतुक केले. राष्ट्रीय स्तरावर बिलियर्डस आणि स्नूकरचे मिश्रण करून एखादी स्पर्धा भरवली गेली, तर अधिक चांगला लाभ होणार असल्याचे त्याने नमूद केले.
बिलियर्ड््ससारख्या खेळाला नक्कीच चांगले पाठीराखे आणि गुंतवणूकदार सापडतील, असेही अडवाणीने नमूद केले. ही एक चांगली सुरुवात असून लवकरात लवकर अशा प्रकारचा उपक्रम राष्ट्रीय स्तरावर व्हावा, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली.