आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायर्न म्युनिक, मँचेस्टर सिटी लीगच्या अंतिम सोळामध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस- बायर्न म्युनिक आणि मँचेस्टर सिटी या आघाडीच्या क्लबनी चॅम्पियन्स लीगच्या प्रारंभिक फेरीत उत्तम कामगिरी करीत चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सोळा संघांमध्ये प्रवेश मिळवला.

गत दोन मोसमांमध्ये अंतिम सोळात प्रवेश मिळवण्यात अपयशी ठरलेल्या मँचेस्टरने दोन वर्षांनंतर ही कामगिरी करून दाखवली आहे. सीएसकेए मॉस्को संघावर 5-2 असा दणदणीत विजय मिळवत त्यांनी ही किमया साधली आहे. बायर्नने व्हिक्टोरिया पिल्सन संघावर 1-0 अशी मात करीत अंतिम फेरीत धडक मारली. दरम्यान, सलग नऊ सामने जिंकल्याने बायर्नने बार्सिलोनाच्या 2002-03 च्या विक्रमाशी बरोबरी केली. या विक्रमाशी बरोबरी केल्याने समाधान असले तरी ही विजयी लय कायम राखण्याचाच आमचा प्रयत्न राहणार असल्याचे बायर्नचे प्रशिक्षक पेप गुआर्डीओलो यांनी नमूद केले.

माद्रिदचा सामना बरोबरीत
रिअल माद्रिद संघाच्या दोन्ही स्टार स्ट्रायकर्सनी ज्युवेंट्सविरुद्ध प्रत्येकी एक गोल करूनदेखील संघाला बरोबरीत समाधान मानावे लागले. रोनाल्डोने पहिला गोल करत ज्युवेंट्सशी बरोबरी साधून दिली, तर गॅरेथ बेलने त्याचा पहिला गोल करीत संघाला 2-1 अशी आघाडीदेखील मिळवून दिली. मात्र ज्युवेंट्सने केलेल्या सातत्यपूर्ण आक्रमणांना रोखणे रिअल माद्रिदच्या बचावफळीला न जमल्याने त्यांनी बरोबरी साधली.