आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parthiv Patel Apply For The Post Of Peon In Income Tax

या आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटपटूने केला चक्‍क शिपाई पदासाठी अर्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा एक क्रिकेटपटू ज्‍याचा आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबादबरोबर वार्षिक 3.15 कोटी रूपयांचा करार आहे. विशेष म्‍हणजे या कराराचा कालावधी आणखी दोन वर्षे आहे. त्‍याच्‍याकडे चक्‍क महागडी बीएमडब्‍ल्‍यूही आहे. हाच खेळाडू आता शिपायाची नोकरी मिळावी म्‍हणून प्रयत्‍न करीत आहे. हा क्रिकेटपटू गुजरात रणजी टीमचा कर्णधार असून देशांतर्गत क्रिकेट टुर्नामेंट खेळल्‍यानंतर त्‍याला दरवर्षी 12 ते 15 लाख रूपये मिळतात. त्‍याच्‍याकडे टीव्‍ही जाहिरातीही आहेत. इतकेच नव्‍हे तर रिलायन्‍स इंडस्‍ट्रीजमध्‍ये तो एक्‍जिक्‍यूटिव्‍हही असून, तिथे त्‍याला पगारही मिळतो. तरीसुद्धा या क्रिकेटपटूने 15 हजार रूपये दरमहा पगार असलेल्‍या शिपाई पदासाठी अर्ज केला आहे. क्रिकेटसाठी वाहिलेल्‍या एका मासिकाने याचा खुलासा केला आहे.

तो एका भव्‍य अशा बंगल्‍यात राहतो. क्रिकेटचा मौसम संपल्‍यानंतर तो आपल्‍या कुटुंबियांबरोबर अमेरिका किंवा युरोपमध्‍ये सुट्टयांची मजा लुटण्‍यासाठी जातो. त्‍याच्‍याकडे चार कार आणि दोन बंगले आहेत. यातील एक बंगला अहमदाबादपासून सुमारे 45 किमी अंतरावरील सुंदर आणि निसर्गरम्‍य गोल्‍फींग रिसॉर्ट किंग्‍ज व्हिलामध्‍ये आहे.

हे सर्व वाचल्‍यानंतर तुम्‍हाला प्रश्‍न पडला असेल की हा क्रिकेटपटू कोण असेल, आणि त्‍याला शिपायाची नोकरी का हवी आहे ? हे जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...