आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्थिव पटेलला पंचांनी हाकलले..!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - एका देशांतर्गत सामन्यात पार्थिव पटेल बुधवारी निळ्या रंगाचे पॅड बांधून मैदानात उतरला. मात्र, पंचांनी त्याला फलंदाजी करू दिली नाही. पांढरे पॅड बांधून आला तरच खेळण्याची परवानगी मिळेल, असे पंचांनी त्याला सांगितले. यानंतर पार्थिवने पंचांशी वाद घातला. त्याने एका अधिकार्‍याशीसुद्धा वाद घातला. पॅड बदलल्यानंतरच त्याला खेळण्याची परवानगी मिळाली.

झव्हेरी टी-20 चषक सामन्यात हा वाद झाला. इन्कम टॅक्स आणि रिझर्व बँक यांच्यातील ही लढत होती. पार्थिव इन्कम टॅक्सकडून खेळत होता. पांढर्‍या ड्रेसमध्ये हा सामना खेळवला जात होता. स्पर्धेच्या एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार पार्थिवने पंचाशिवाय मंडळाचे अधिकारी जयेंद्र सेहगल यांच्याशी हुज्जत घातली होती.

वाद झाला नाही : पार्थिव - रंगीत पॅड बदलून खेळण्यास आल्याचे पार्थिवने मान्य केले. मात्र, आपला कोणाशीच वाद झाला नाही, असेही तो म्हणाला. सेहगल यांना फोन करण्यात आला, एसएमएसही करण्यात आला. मात्र, त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. ‘मी मैदानावर होतो तोपर्यंत असे काहीच घडले नाही,’ असे गुजरात क्रिकेट संघटनेचे सचिव राजेश पटेल यांनी सांगितले.