आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीलंकेमध्ये तामिळींच्या कथित नरसंहारावरुन भारतात राजकारण सुरु झाले आहे. या मुद्यावरुन डीएमकेने केंद्र सरकारचा पाठिंबा मागे घेतला. तर चेन्नईमध्ये श्रीलंकेविरुद्ध निदर्शने करण्यात येत आहेत. परंतु, या राजकारणाचा परिणाम क्रिकेटवरही होण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात सुरु होणा-या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेच्या क्रिकेटपटुंच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. श्रीलंकेच्या क्रिकेटपटू संघटनेने सध्याच्या परिस्थितीवरुन खेळाडुंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
आयपीएलच्या 9 संघांमध्ये श्रीलंकेचे 8 खेळाडू सध्या आहेत. चेन्नईला होणा-या सामन्यांबाबत बीसीसीआयनेही चिंता व्यक्त केली आहे. तामिळनाडूचे नेते श्रीलंकेचा जोरदार निषेध करीत आहेत. यामुद्यावरुन राजकीय वातावरणही तापले आहे. अशा स्थितीत खेळाडुंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. काही खेळाडू चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळतात. त्यांचे बहुतांश सामने चेन्नईतच होतील. नुकतेच श्रीलंकेच्या एका बौद्ध भिख्खूंना चेन्नईत मारहाण करण्यात आली होता. याचा कोलंबोमध्ये निषेधही करण्यात आला. त्यामुळे श्रीलंकेच्या खेळाडुंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.